10वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,स्टाफ सिलेक्शन अंतर्गत तब्बल 26146 रिक्त पदांची भरती,आजच आपला अर्ज करा ! SSC GD Constable Bharti 2023

Spread the love

SSC GD Constable Bharti 2023
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10वी पास उमेदवारांना चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे.स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून १०वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी तब्बल २६१४६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदरच्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ असणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज या मुदतीच्या आत करणे आवश्यक आहे.भरतीसाठी रिक्त पदे,आवश्यक कागदपत्रे,तसेच इतर बाबी यांची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.तसेच उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

SSC GD Constable Bharti 2023

संस्थेचे नाव – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल,आसाम रायफल्स आणि इतर

एकूण रिक्त पदे – २६१४६ पदे

रिक्त पदांचा तपशील

सीमा सुरक्षा दल (BSF) – ६१७४ पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) – ११०२५ पदे
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) – ३३३७ पदे
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस ( ITBP) – ३१८९ पदे
सशस्त्र सीमा बल (SSB) – ६३५ पदे
सचिवालय सुरक्षा दल (SSF) – २९६ पदे
आसाम रायफल्स (AR) – १४९० पदे

हे पण वाचा:- पोलिस भरती व्हायचंय ना?मग लागा तयारीला,ही संधी अजिबात सोडू नका,तब्बल 60244 रिक्त पोलिस पदांची मेगा भरती!

नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता १०वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अनु.जाती/जमाती प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे
इतर मागास प्रवर्ग – १८ ते २६ वर्षे
सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते २३ वर्षे

परीक्षेचे स्वरूप – कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा

अर्ज शुल्क – अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवार यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

वेतनश्रेणी – Pay Level-3 (21700 ते 69100/- रुपये)

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

२४ नोव्हेंबर २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

३१ डिसेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात📝- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा

How to apply for SSC GD Constable Bharti 2023

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore,the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment