Sugarcane Harvester Subsidy:- आता ऊस तोडणी यंत्रासाठी मिळणार तब्बल 50 लाख रूपये अनुदान,कुठे करायचा अर्ज,जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

Sugarcane Harvester Subsidy In Maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्यात मागील हंगामातील ऊस लागवडीखालील क्षेत्र १४.८८ लाख हेक्टर इतके असून १३२१ लाख मेट्रीक टन इतके ऊसाचे गाळप झाले आहे.राज्यात ऊस तोडणी व वाहतूकीचे काम हे ऊसतोडणी मजूरांमार्फत केले जाते.शासनाने ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांचा आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावला आहे.त्यामुळे मागील काही हंगामात राज्यातील ऊसतोडणी मजूरांची संख्या कमी होत असल्यामुळे ऊस तोडणीची समस्या भेडसावत आहे.

काय आहे योजना?
Sugarcane Harvester Subsidy

भविष्यात ऊसतोडणी वेळेवर होण्यासाठी ऊस तोडणीचे काम ऊस तोडणी यंत्राव्दारे करणे गरजेचे झाले आहे. तथापि,ऊस तोडणी यंत्राच्या किंमती जास्त असल्यामुळे यंत्राच्या खरेदीदारास काही प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिल्यास यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडण्यास प्रोत्साहन मिळेल व ऊस तोडणी वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.राज्य शासनाने ऊसतोडणी यंत्रास अनुदान देणेकरीता केंद्र शासनास प्रस्ताव सादर केलेला होता.त्यास अनुसरून केंद्र शासनाने ऊस तोडणी यंत्र खरेदीस राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोणाला मिळणार लाभ?
Sugarcane Harvester Subsidy In Maharashtra

Sugarcane Harvester Subsidy

महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने,शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

किती अनुदान मिळणार?
Sugarcane Harvester Subsidy

Sugarcane Harvester Subsidy

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी सुरुवातीला ४० टक्के अनुदान किंवा ३५ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात दिली जात होती.परंतु आता याच अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (यांत्रिक आणि तंत्रज्ञान विभाग) विभागाचे उप आयुक्त यांनी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी एक परिपत्रक काढले आहे.त्या परिपत्रकानुसार ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान किंवा ५० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४० टक्के अनुदान किंवा ४० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता ट्रॅक्टर खरेदी साठी मिळणार तब्बल ५ लाख रुपये अनुदान!

किती यंत्रे वाटप केली जाणार?

Sugarcane Harvester Subsidy

राज्य सरकारच्या वतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ४५० आणि सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ४५० असे एकूण ९०० ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.राज्य सरकारकडून यंत्रांच्या खरेदीसाठी उपलब्ध निधी तसेच ऊस तोडणी यंत्राच्या उपलब्धतेनुसारच अर्जांना मंजुरी दिली जाणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

१)वैयक्तिक शेतकरी,उद्योजक यांचेबाबतीत एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी तसेच शेती सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत एका संस्थेस एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी संपूर्ण योजना कालावधीत अनुदान देय राहील.

२)सदर योजनेमध्ये सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त ३ (तीन) ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

३)पात्र लाभार्थी यांनी यंत्र किंमतीच्या किमान २०% रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.उर्वरीत रक्कम ही कर्जरूपाने उभे करण्याची जबाबदारी पात्र लाभार्थ्यांनी करायची आहे.

४)ऊसतोडणी यंत्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक कर्ज खात्यात PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल.

५)सदर योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास खरेदी अनुदान मिळणेकरिता अर्जदारांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने परिपुर्ण प्रस्ताव कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

६)ऊस तोडणी यंत्रासाठी यापूर्वी अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यास या योजनेखाली पुन्हा लाभ घेता येणार नाही.

७)केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या यंत्र उत्पादक कंपन्यांनी बनविलेल्या यंत्रांपैकी एका ऊसतोडणी यंत्राची निवड संबधित लाभार्थ्यांना करावी लागणार आहे.

८)ऊसतोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र राज्यामध्ये करणे बंधनकारक राहील.

९)ऊसतोडणी यंत्रास काम मिळवण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील.

अर्ज कुठे करायचा?
Sugarcane Harvester Subsidy Scheme

शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.त्याची लिंक आम्ही खाली दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment