Swayam Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इ.१२ वी नंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या एकूण २०,००० संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन,निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी तालुकास्तर,जिल्हास्तर, विभागीयस्तर व मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये भत्त्याची रक्कम थेट जमा करण्यासाठी “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना”(Swayam Yojana) सुरू करण्यात आलेली आहे.
वयाची अट
पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे अशी तरतूद आहे.सदर तरतूदीमध्ये सुधारणा करुन सदर वयोमर्यादा ३० करण्याबाबतची मागणी विविध स्तरावरुन करण्यात येत होती.सदर मागणीच्या अनुषंगाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वयाची मर्यादा ३० वर्ष करण्यात आलेली आहे.
अर्ज कुठे करायचा?
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी काही तांत्रिक अडचणीमुळे जे विद्यार्थी अद्याप पर्यंत अर्ज करू शकले नाहीत अशा विद्यार्थांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून पात्र विद्यार्थांना अर्ज करता येणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.