Talathi Bharti Result :- या दिवशी लागणार तलाठी भरती परीक्षेचा निकाल!

Spread the love

Talathi Bharti Result

Talathi Bharti Result
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजच्या लेखामधून आपण बहुचर्चित असलेल्या तलाठी भरती निकालाच्या संदर्भातील महत्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत.संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या तलाठी भरती प्रक्रिया 14 सप्टेंबर रोजी पूर्ण झाली.Talathi Bharti Result

तलाठी भरतीच्या परिक्षेकरीता ४४६६ जागांकरिता राज्यातील सुमारे १० लाख ४१ हजार उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते.त्यापैकी ८ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली होती.सर्व उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा असणार आहे.

उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरल्याने ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये 3 सत्रात घेण्यात आली होती.त्यानुसार पहिला टप्पा १७ ते २२ ऑगस्ट,दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा ४ ते १४ सप्टेंबर असा पद्धतीने घेण्यात आली होती.Talathi Bharti Result

तसेच प्रत्येक दिवशी 3 वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही परीक्षा पार पाडण्यात आली होती.एकूण ५७ सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली आहे.

हे पण वाचा:- एवढे वार्षिक उत्पन्न असेल तर सरकार देणार कायमस्वरूपी घर

सदरची परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून कॉम्प्युटर वर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.नुकत्याच काही दिवसांपूर्वी भूमिअभिलेख च्या अधिकृत वेबसाईट वर उमेदवारांच्या Response Sheet अपलोड करण्यात आल्या आहेत.Talathi Bharti Result

उमेदवारांना आपण सोडवलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये काही आक्षेप आढळून आल्यास अपील करता येणार आहे. त्याकरिता एका प्रश्नासाठी 100 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

सदरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूमिअभिलेख खाते दिवाळीपूर्वी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment