Transformer Burned :- ट्रान्सफॉर्मर जळाले चिंता करायची गरज नाही,महावितरणच्या मोबाईल ॲप वरून अशी करा तक्रार!

Spread the love

Transformer Burned

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एम एच खबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आता रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे.गहू आणि हरभरा सारख्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थीतरित्या मिळणे आवश्यक आहे.परंतु ग्रामीण भागात एकाच ट्रान्सफॉर्मर वरती अनेक शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन दिले गेले आहे.त्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळल्याच्या तसेच नादुरुस्त झाल्याच्या घटना सतत घडत असतात.

अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध असून देखील पिकांना सिंचन करता येत नाही.आणि अशा प्रकारच्या खूप साऱ्या तक्रारी महावितरण विभागाला मिळाल्याने अशी नादुरुस्त झालेली रोहित्र तत्काळ दुरुस्त करून देण्यात यावी अशा आदेश ऊर्जामंत्री यांनी महावितरण विभागाला दिला होता.

रोहित्र नादुरुस्त झाल्यास रोहित्र दुरुस्तीचा आणि ते बदलून देण्याचा कालावधी कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करावा.यासाठी वीज ग्राहकाला तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांक जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत.रब्बीचे आता केवळ तीन महिने राहिले असून सिंचनासाठी वीज मिळणे आवश्यक आहे.नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त(Transformer Burned) करावे व तेलाचा पुरवठा त्वरित करावा.याबाबतच्या कार्यवाहीत अजिबात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही ऊर्जामंत्री यांनी महावितरणच्या फोर्टस्थित कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

मोबाइल ॲप्लिकेशन वरून करता येणार तक्रार

महावितरण विभागाकडून राज्यातील विद्युत ग्राहकांसाठी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नादुरुस्त रोहित्र आणि ट्रान्सफॉर्मर साठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येणार आहे.यासाठी ग्राहकांना आपल्या मोबाईल मध्ये महावितरणचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

हे पण वाचा:- राज्यात महावितरण सोलर पंप वाटप योजना सुरू,अर्ज करणाऱ्या पहिल्या १ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

अशी करा ऑनलाईन तक्रार Transformer Burned

 • आपल्या मोबाईल मधील गूगल प्ले स्टोअरवर जाऊन महावितरणचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.
 • मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर इंस्टॉल करून घ्या.
 • ॲप्लिकेशन इंस्टॉल करून झाल्यानंतर आपला वीज ग्राहक क्रमांक,मोबाईल क्रमांक तसेच ई मेल आयडी वापरून आपले रजिस्ट्रेशन करून घ्या.
 • त्यासाठी आपल्याला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
 • हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून घ्या.
 • आता ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्यासमोर बरेच पर्याय आपल्याला दिसणार आहेत.
 • त्यातील “नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • आपल्यासमोर आपला ग्राहक क्रमांक दाखविला जाईल त्यावर क्लिक करायचे आहे.
 • पुढे आपल्या समोर आपल्या रोहित्राची माहिती ओपन होईल तिथे आपल्याला जवळची खूण या पर्यायसमोर नादुरुस्त झालेल्या रोहित्राचे ठिकाण टाकायचे आहे.
 • आपले रोहित्र कधी पासून नादुरुस्त आहे त्याची तारीख आपल्याला टाकायची आहे.
 • आता आपल्याला नादुरुस्त असलेल्या रोहित्राचा फोटो काढायचा आहे.
 • नादुरुस्तीचे तपशीलवार वर्णन या पर्यायासमोर आपल्या रोहित्रची नादुरुस्तीचे कारण तसेच काय अडचण आहे याची माहिती द्यायची आहे.
 • शेवटी आपल्याला तक्रार नोंद करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • अशा प्रकारे आपण आपल्या नादुरुस्त असलेल्या रोहीत्राची तक्रार मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment