Vihir Yojana Maharashtra
Vihir Yojana Maharashtra | महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत शेतीच्या सिंचनासाठी विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.या संदर्भातील शासन निर्णय
४ नोव्हेंबर २०२२ रोजी जारी करण्यात आला आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ८७ हजार ५०० विहिरी खोदणे शक्य असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान म्हणून देत आहे.त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? पात्रतेचे निकष काय आहेत? या बद्दल माहिती जाणून घेऊ यात..
Table of Contents
लाभधारक शेतकऱ्याची निवड कशी होते?
सदर योजने अंतर्गत शासन निर्णयानुसार काही विशिष्ट प्रवर्गातील अर्जदारास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
१.अनुसूचित जाती
२.अनुसूचित जमाती
३.विमुक्त जाती
४.भटक्या जमाती
५.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
६.स्त्री -कर्ता असलेली कुटुंबे
७.विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
८.अल्पभूधारक शेतकरी(५ एकर पर्यंत शेत जमीन)
९.सीमांत शेतकरी(२.५ एकर पर्यंत शेत जमीन)
१०.इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
११.जमीन सुधारणांचे लाभार्थी
लाभधारक व्यक्तीची आवश्यक पात्रता
१.लाभधारक व्यक्तीकडे १ एकर शेतजमीन सलग असावी.
२.गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून सिंचन विहिरीचे अंतर हे ५०० मीटर असायला हवे.
३. दोन विहिरींमध्ये १५० मीटर अंतराची जुनी अट अनुसूचित जाती – जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास तसेच खासगी विहिरी पासून १५० मीटर अंतराची अट लागू असणार नाही.
४.लाभधारक व्यक्तीच्या सात बारा उताऱ्यावर पूर्वीची विहिरीची नोंद असू नये.
५.अर्जदारकडे जॉब कार्ड असावे.
६.लाभधारक व्यक्तीकडे जमिनीचा ८- अ उतारा असावा.
अर्ज कुठे व कसा करायचा?
मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचा(Vihir Yojana Maharashtra) लाभ घेण्यासाठी अर्जदारास आपला अर्ज ग्रामपंचायत कडे ऑफलाईन पद्धतीने जमा करावयाचा आहे.
अर्जाचा नमुना खालीलप्रमाणे.
आवश्यक कागदपत्रे
१.मनरेगा जॉब कार्ड ची प्रत
२.सात बारा उतारा
३.८ अ उतारा
४.सामुदायिक विहीर खोदायची असल्यास सर्व शेतकरी मिळून ४० गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा तसेच सर्वानुमते पाणी वाटपाचे करारपत्र असणे आवश्यक.
सदर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज हा ग्रामपंचायत मध्ये जमा करावयाचा आहे.ऑनलाईन भरण्याचे काम हे ग्रामपंचायत करेल.तसेच जमा केलेल्या अर्जाची पोच पावती घ्यायची आहे.
हे पण वाचा:- गुंठयात जमीन खरेदी विक्री करता येणार, खरेदीसाठी निर्बंध उठवले!
विहिरीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर विहिरीचे काम २ वर्षात करणे बंधनकारक आहे.अपवादात्मक परिस्थितीत मध्ये याचा कालावधी ३ वर्षाचा असेल.
अनुदानाची रक्कम किती?
राज्यातील प्रत्येक स्थानिक भागाची भौगोलिक परिस्थिती ही सारखी नाही. त्यामुळे अनुदान संबंधी आर्थिक निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ते निर्णय घेतील.
त्यानुसार एका विहिरिसाठी(Vihir Yojana Maharashtra) ४ लाख रुपये इतके अनुदान प्रत्येक जिल्ह्याने द्यावे.असे सरकारने स्पष्ट केले आहे.
अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुप ला जॉईन व्हा.