Voter List pdf ग्राम पंचायत नुसार मतदार यादी जाहीर,तुमचे नाव आहे का यादीत?लगेच चेक करा!

Spread the love

Voter List pdf

New Voter List pdf नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावाची मतदार यादी आपल्या मोबाईल वरून कशी पहायची याची माहिती घेणार आहोत.त्याचबरोबर आपले मतदान कार्ड जर हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने कशे मिळवायचे याची देखील माहिती घेणार आहोत.आपण आपल्या गावाची मतदार यादी (Voter List) आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपले नाव यादीत चेक करायचे आहे.

Gram Panchayat Voter List Download

तुम्ही आपल्या मोबाईल वरून संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार याद्या डाऊनलोड (Voter List Download) करू शकणार आहेत.आपल्या ग्रामपंचायतच्या मतदार याद्या डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्याची लिंक खाली दिलेली आहे.

सदर वेबसाईटला भेट दिल्यावर आपण आपल्या ग्रामपंचायतच्या मतदार याद्या pdf (voter id list pdf download in marathi)डाऊनलोड करू शकणार आहेत.

मतदार यादी कशी डाऊनलोड करायची ?Voter List pdf

1)मतदार यादी पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला इंटरनेट ब्राऊझर ओपन करावा लागेल.

2)इंटरनेट ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला ceo.mahatashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे.(ज्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.)

3)आपल्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.आपल्याला उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात आडव्या 03 रेषा दिसतील ज्याच्यावर क्लिक करायचे आहे.

4)येथे क्लिक केल्यावर आपल्यासमोर बरेच ऑप्शन दिसतील त्यातील Electoral Roll या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

5)नंतर आपल्याला PDF Electoral Roll या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

6)आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.त्या पेजवर Select District या ऑप्शन समोरील रकान्यात आपला जिल्हा निवडायचा आहे.

7)जिल्हा निवडल्यानंतर Select Assembly Constituency या ऑप्शन समोरील रकान्यात आपला विधानसभेचा मतदार संघ निवडायचा आहे.

8)तो निवडल्यानंतर Select Part या ऑप्शन समोरील रकान्यात आपल्या ग्राम पंचायतचे (Gram Panchayat Voter List Download) नाव निवडायचे आहे.

9)आपल्या गावाचे नाव निवडून झाल्यानंतर आपल्याला Captcha Code टाकायचा आहे.ते टाकून झाल्यानंतर Open Pdf या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपल्या ग्रामपंचायतची मतदार यादी आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल.

ग्रामपंचायत मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मतदार यादीत आपले नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment