Wanshawal Kashi Kadhavi:- काय असते वंशावळ? कशी काढली जाते? घ्या संपूर्ण माहिती!

Spread the love

Wanshawal Kashi Kadhavi

Wanshawal Kashi Kadhavi
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखामधून वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढली जाते? तिचा उपयोग कशासाठी होतो या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.चला तर मग घेऊ या जाणून.

वंशावळ म्हणजे काय?

वंशावळ म्हणजे आपल्या संपूर्ण पिढीचा आज पर्यंतच्या इतिहासच असतो.आपल्या कुटुंबातील पहिल्या व्यक्तिपासून ते आपल्या पर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीमध्ये सविस्तरपणे नमूद केलेली असते.

याच वंशावळीला इंग्रजीमध्ये फॅमिली ट्री म्हणले जाते.आपल्या आजोबा,पणजोबा किंवा खापर पणजोबा पासून सर्वांची नावे उतरत्या क्रमाने वंशावळी मध्ये नमूद केलेली असतात.

वंशावळ कशी काढली जाते?

Wanshawal Kashi Kadhavi
तुमची वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या अगोदरच्या पिढीतील लोकांची नावे उतरत्या क्रमाने लिहावी लागतील.
जसे की अगोदर पणजोबा नंतर त्यांची मुलं म्हणजे आपले आजोबा.आजोबांचे भाऊ तसेच आपल्या आजोबांची मुले म्हणजे आपले वडील आणि चुलते.

ज्या कोण्या व्यक्तीला आपले जात प्रमाणपत्र काढावयाचे आहे त्या व्यक्ती पासून ते पणजोबा पर्यंत अशी वंशावळ काढावी लागते.अगोदरच्या काळात निजाम सरकार लोकांच्या जातनिहाय नोंदी करत असते.

आताच झालेल्या मराठा कुणबी आरक्षणासाठी निजाम कालीन नोंदींना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. तुम्हाला जर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्हाला निजाम कालीन नोंदींमध्ये तुमच्या पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्या नावापुढे कुणबी असा उल्लेख आहे की नाही हे शोधावे लागेल.Wanshawal Kashi Kadhavi

हे शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयातील जुने हक्क रेकॉर्ड तपासावे लागेल.तहसील कार्यालयात जे कोतवाल बुक असते त्या मध्ये जन्म मृत्यूची नोंदवही असते.तिथे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा इतिहास मिळतो.

वंशावळ कशासाठी लागते?

आताच्या काळात एखाद्या व्यक्तीची जन्म नोंद लावताना त्याच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला जात नाही.पूर्वी जन्म नोंद करताना व्यक्तीच्या नावासमोर जातीचा देखील उल्लेख केला जात असे.Wanshawal Kashi Kadhavi

आता काही विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र काढावयाचे झाल्यास जातीचा पुरावा म्हणून पूर्वजांचे जातीचा उल्लेख असलेली कागदपत्रे आवश्यक असतात.त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो.त्यामुळे जात पडताळणी करण्यासाठी वंशावळ खूप गरजेची असते.

वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची?

ज्या व्यक्तीला जात पडताळणी करण्यासाठी वंशावळ गरजेची असते त्यांनाच ती काढावी लागते.

वंशावळ ही स्वयंघोषित असल्याने ती अर्जदाराने स्वतःच लिहून द्यायची असते.

वंशावळ काढण्यासाठी कुठे ही अर्ज करण्याची गरज नसते.

कुटुंबातील एका व्यक्तीने वंशावळ काढताना जर त्यांच्या पूर्वजांची कुणबी नोंद आढळून आली तर त्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचे जात प्रमाणपत्र कुणबी म्हणून दिले जाते. याचा फायदा कुटुंबातील मुलांना शैक्षणिक दृष्ट्या मिळतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा

Leave a comment