Weather Forecast
Weather Forecast
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटमुळे परेशान झालेल्या नागरिकांना थंडीमुळे काही प्रमाणात सुटका मिळाली आहे.
राज्यातील अनेक भागातील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव येथे शुक्रवारी (ता.२७) रोजी राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.
हे पण वाचा:- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा आदेश या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर
राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे तापमानामध्ये कमालीची वाढ झाली होती.ऑक्टोबर महिन्यातच उन्हाळ्यासारखे उन्हाचे चटके बसत होते.परंतु मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा खाली आलेला दिसत आहे.
कोकण आणि रत्नागिरी वगळता राज्यातील इतर ठिकाणी दिवसाचे तापमान हे 33 अंश सेल्सिअसच्या खाली आल्याचे दिसून आले आहे.
राज्यात आता थंडीची चाहूल जाणवू लागली आहे.उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनो आता सध्या तरी पावसाची कुठलीही शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यातील कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
विदर्भ विभाग
अकोला ३४.७ (१७.५),अमरावती ३२.६ (१६.५),बुलढाणा ३२.५ (१७.६),चंद्रपूर ३१.६ (१६.४),नागपूर ३२.२ (३२.१), वर्धा ३२.१ (१६.४), वाशिम ३४.२ (१४.८), यवतमाळ ३४.० (१५.२)
पश्चिम महाराष्ट्र
पुणे ३२.६ (१४.४),नाशिक ३२.३ (१५),निफाड ३२.८ (१२.८), सांगली ३३.४ (१८.१),सातारा ३२.५ (१५.७), सोलापूर ३५.८ (१६.५),कोल्हापूर ३२.१ (१९.१)
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.