Well Subsidy Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली यावी तसेच शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने रोजगार हमी योजनेतून विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जात आहे.
विहिरीमुळे शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतीचे उत्पन्न वाढेल.तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल.याच उद्देशाने शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान(Well Subsidy Maharashtra) वितरित करण्यात येत आहे.सरकारने या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागेल त्याला विहीर योजनेच्या अंतर्गत राज्यातील १० लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान १५ विहिरींचे बांधकाम करायचे सुचवावे अशी सूचना सरकारने दिली आहे.
विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे नावे किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- शेतजमिनीची कमाल मर्यादा ही 6 हेक्टर पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे.
- शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याला आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
- नवीन विहिरीसाठीची जागा पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरी पासून ५०० फूट असावी.
- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला आवश्यक आहे.
हे पण वाचा:- आता विहिरीसाठी मिळणार ४ लाख रुपये अनुदान,तुमच्या मोबाईलवरून देखील करता येणार अर्ज!
अर्ज कुठे करायचा?
- पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
- ग्रामपंचायत कडे अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव घेईल.
- ग्रामपंचायत कडून अर्ज मंजुरीसाठी बीडीओ यांच्याकडे सादर केला जाईल.
- अर्जाची पडताळणी करून पंचायत समिती कार्यालयाकडून अर्जाला मंजुरी दिली जाईल.
- अर्ज मंजूर होईपर्यंत शेतकऱ्यांनी विहिरीची खोदाई सुरू करू नये.
राज्यातील शेतकऱ्यांना सदर योजनेच्या अंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलिताखाली आल्याने शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.