या जिल्ह्यासाठी 1049 लाभार्थ्यांची घरकुल यादी जाहीर,यादीत आपले नाव आहे की नाही असे करा चेक! Yashwantrao Gharkul List

Spread the love

Yashwantrao Gharkul List
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अंतर्गत घरकुलांचे वाटप करण्यात येते.या योजनेच्या अंतर्गत डोंगराळ भागातील घरकुल लाभार्थ्यांना १.३० लाख रुपये आणि इतर भागातील लाभार्थ्यांना १.२० लाख रुपये अनुदान देण्यात येते.

महाराष्ट्र राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यातील घरकुलांना निधी देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या(Yashwantrao Gharkul List)अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यातील १०४९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.

हे पण वाचा:- अखेर या ९ जिल्ह्यांतील घरकुलांची यादी जाहीर,यादीत आपले नाव चेक करा!

१०४९ घरकुलांच्या लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी १.२० लाख रुपये प्रमाणे १२,५८,८०,०००/- रुपये व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रती घरकुल ४८००/- रुपये प्रमाणे) ५०,३५,२००/- रुपये अशा एकूण १३,०९,१५,२००/- रुपये इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त ३,२८,००,०००/- रुपये इतका निधी वितरित करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार वितरित करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांसाठी सूचना

•विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे.

•लाभार्थ्यांना आपला सन २०२३-२४ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

•लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

•लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या/वडिलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

•पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार आढळून आल्यास सदरची नावे वगळण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment