PM Kisan Yojana
PM Kisan Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारने संपूर्ण देशभर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबविली आहे.या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.जेव्हा २०२०-२१ मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचे १.०८ कोटी लाभार्थी संख्या होती.
Table of Contents
आता नवीन आलेल्या माहितीनुसार सन २०२२-२३ या वर्षात लाभार्थी संख्या १.०४ कोटी होती.आणि आता २०२३-२४ च्या जुलै महिन्यात हीच लाभार्थी संख्या ८५.४० लाख आहे.त्यामुळे योजना सुरू झाल्यापासून लाभार्थी संख्या २२.४० लाखांनी कमी झाली आहे.
हे पण वाचा:- आता तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर,जाणून घ्या तुमच्या मोबाईलवरून!
योजनेच्या नियमात बदल केल्यामुळे लाभार्थी संख्या कमी
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाली तेव्हा राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली नोंदणी या योजनेसाठी केली होती.कालांतराने बोगस लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले.तसेच जे शेतकरी पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचे शासनाच्या लक्षात आल्यावर अशा शेतकऱ्यांचा पत्ता कट करण्यात आला.
अलीकडेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केल्याने देखील लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.काही मयत शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील योजनेचा हप्ता जमा करण्यात येत होता.परंतु आता ई केवायसी बंधनकारक केल्याने अशा मयत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल २२.४० लाखाने कमी झाली आहे.या मध्ये सर्वाधिक लाभार्थी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.अहमदनगर जिल्ह्यात ५.१७ लाख शेतकरी,सोलापूर (४.५४लाख),बीड आणि पुणे(३.८९लाख),कोल्हापूर(४.०६लाख),नाशिक(३.८५लाख).
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.