Asian Paints Dealership
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखाच्या माध्यमातून एशियन पेंट्सची डीलरशिप कशी मिळवायची याबाबतची माहिती जाणून घेणार आहेत.एशियन पेंट्स ही भारतातील बहुराष्ट्रीय पेंट कंपनी आहे.तिचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे.एशियन पेंट्स ही कंपनी डेकोरेशन संबंधित उत्पादने, बाथ फिटिंग संबंधित सेवा पुरविते.
Table of Contents
एशियन पेंट्स या कंपनीची स्थापना 1 फेब्रुवारी 1942 रोजी झाली आहे.ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी असून ती बर्जर इंटरनॅशनलची होल्डींग कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेसह जगातील 15 देशांमध्ये कंपनीची उत्पादने विकली जातात.भारतीय बाजारपेठेत या कंपनीचा हिस्सा जवळपास 40 टक्के आहे.
एशियन पेंट्स ही कंपनी फक्त डीलरशिप मॉडेल वर कार्य करते.कंपनी डिस्ट्रीब्युटरशिप आणि सब डीलरशिप मॉडेल वर काम करत नाही.चला तर मग जाणून घेऊ या एशियन पेंट्सची डीलरशिप कशी मिळवायची?
How to get Asian Paints Dealership?
एशियन पेंट्सची डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला एशियन पेंट्सच्या तुमच्या भागातील विक्री अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.त्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एशियन पेंट्सच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून घेऊ शकता.18002095678
तुम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ते तुमच्या सोबत भेट घेऊन तुमची व्यवसायिक पार्श्र्वभूमी जाणून घेतील.तसेच तुमच्या दुकानाची जागा,तुमच्या मार्केट मधील इतर डीलर्स ची घनता,तुमचा या क्षेत्रातील अनुभव तसेच तुमची आर्थिक पार्श्र्वभूमीची माहिती घेतली जाईल.
Asian Paints Dealership
एशियन पेंट्सच्या डीलरशिप साठी किती पैसे लागतात?
Asian Paints Dealership Cost
भारतासारख्या ठिकाणी एशियन पेंट्सची डीलरशिप घेण्यासाठी सुमारे 6 ते 8 लाख रुपये मोजावे लागतात.
यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
•यामध्ये सुरुवातीला स्टॉक खरेदी करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत (जीएसटी सह)खर्च येतो.
•कलर मिक्सिंग मशिनसाठी 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च लागतो.
•बिलिंग साठी संगणक आणि प्रिंटर साठी किमान 50,000 रू खर्च येतो.
•इतर खर्च 20 ते 25 हजार रुपये
•तुमचे स्वतःचे दुकान नसल्यास तुम्हाला दुकानासाठी ठेव आणि पहिल्या महिन्याचे भाडे लागेल.
एशियन पेंट्स डीलरशिप मधील प्रॉफिट मार्जिन
Asian Paints Dealership Profit Margin
बाजापेठेतील इतर पेंट्सच्या तुलनेत एशियन पेंट्स कमी नफा देतात.परंतु कंपनीची बाजापेठेतील 40 टक्के हिस्सेदारी पाहता तुम्ही या मधून खूप सारे पैसे कमावू शकता.
कंपनी आपल्या दुकानदारांना विविध ऑफर्स आणि योजनांच्या माध्यमातून नफा आणि मार्जीन ठरवते.तसेच रोख सवलत आणि RPBT सूट देते.तसेच व्यावसायिकाने 3 दिवसांच्या आत कंपनीला पेमेंट केल्यास 5 टक्के पर्यंत रोख सवलत देते आणि 9 दिवसांच्या आत पेमेंट केल्यास 3.5 पर्यंत RPBT सूट मिळते.Asian Paints Dealership
हे पण वाचा:- आता मिळवा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तेही ऑनलाईन!
आवश्यक असलेले परवाने आणि नोंदणी
Licenses and Registration Required
•महाराष्ट्र राज्य दुकाने अधिनियम प्रमाणपत्र
•एशियन पेंट्स कडील अधिकृत डीलरशिप प्रमाणपत्र
•स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिका यांचा व्यापार परवाना
•जीएसटी नोंदणी
•व्यवसाय नोंदणी (एकल मालक/पार्टनरशिप फर्म/LLP/Pvt Ltd)
•दुकान भाडेकरार किंवा स्वामालकीचे असल्यास खाते उतारा
तुम्हाला एशियन पेंट्सच्या डीलरशिप बाबत आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही वर नमूद केलेल्या क्रमांकावर कॉल करून संपर्क साधू शकता किंवा तुमचा संपर्क तपशील एशियन पेंट्सच्या customercare@asianpaints.com या ईमेल आयडीवर देखील शेअर करू शकता.कंपनीचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.