Aapli Chawdi
Aapli Chawdi
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.तुम्हाला आत्ता आपल्याच गावातील खरेदी विक्री चे व्यवहार आपल्याच मोबाईलवरून पाहता येणार आहेत. त्यासाठी आज ही खास बातमी आपल्यासाठी आहे.
आपल्याकडील मोबाईलवरून आपणही इंटरनेटचा वापर करून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार कसे पाहता येतील याबद्दल माहिती घेऊयात.Aapli Chawdi
मित्रांनो आजकालच्या इंटरनेटच्या युगात बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. शासनाने देखील सामान्य लोकांची पैसा आणि वेळेसाठी होणारी परफड थांबवण्यासाठी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत.
आता आपण जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार कसे पाहायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहेत. यासाठी आपल्याला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील गुगल क्रोम मध्ये जाऊन http://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi हे पोर्टल ओपन करायचे आहे.त्यासाठी येथे क्लिक करा.
पोर्टल ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण आपला जिल्हा निवडायचा आहे.
हे पण नक्की वाचा:- आता तुमच्या ग्राम पंचायतच्या सर्व योजनांची माहिती मिळवा मोबाईलवर
त्यानंतर आपला तालुका निवडून आपले गाव निवडायचे आहे. शेवटी तिथे दाखवलेला captcha कोड टाकून आपली चावडी पहा वर क्लिक करायचे आहे.
आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपण आपल्या गावातील जमीन खरेदी विक्री तसेच इतर फेरफार जसे की विहीर नोंद,वारस नोंद,हक्कसोड पत्र इत्यादी ची माहिती घर बसल्या पाहू शकता.
वरील माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा तसेच नवनवीन शेतकरी योजनांच्या माहितीसाठी पेजला नक्की फॉलो करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.