Agriculture | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकी’ आर्थिक मदत!

Spread the love

Agriculture
राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत.शासनाने 40 तालुके आणि इतर एक हजार एकवीस महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत.परंतु नव्याने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या शेतकऱ्यांना केवळ सवलती मिळणार आहेत.त्यांना आर्थिक मदत देणे परवडणारे नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.

सुरुवातीला जाहीर केलेल्या 40 तालुक्यांतील शेतकऱ्यांना (Agriculture) सवलती सोबतच आर्थिक मदत केली जाणार आहे.

हे पण वाचा:- राज्यात दोन दिवस या ठिकाणी पडणार पाऊस,हवामान विभागाचा नवीन अंदाज!

शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे.ही आर्थिक तरतूद राज्य सरकारने ‘एसडीआरएफ‘ अंतर्गत करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना दुष्काळ निधीच्या स्वरूपात जिरायती शेतीसाठी ८,५०० रुपये,बागायती शेतीसाठी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक तसेच फळबागांसाठी २२,५०० रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने लवकरच प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना या देखील सवलती मिळणार
दुष्काळग्रस्तांच्या पीककर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जच्या वसुलीस स्थगिती,शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये ३३.५० टक्के सूट,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी,रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता,आवश्यक त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा,पाणी टंचाई जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा सवलती दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment