राज्यात दोन दिवस या ठिकाणी पडणार पाऊस, हवामान विभागाचा नवीन अंदाज| Maharashtra Havaman Andaj

Spread the love

Maharashtra Havaman Andaj
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच श्रीलंकेपासून बंगालच्या खाडीपर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.या दोन्ही वातावरणीय प्रणालींमुळे गुरुवार,२३ नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने राज्यात वाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गुरुवारी,२३ नोव्हेंबर रोजी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे पण वाचा:-राज्यात या तारखांना पडणार मुसळधार पाऊस,पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज!

राज्यात पुढील दोन दिवस,बुधवारपर्यंत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे दोन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.गुरुवारी,२३ नोव्हेंबरनंतर बाष्पयुक्त वारे राज्यात(Maharashtra Havaman Andaj) येणार असल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक केली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment