राज्यात या तारखांना पडणार मुसळधार पाऊस,पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज!Punjab Dakh Havaman Andaj 2023

Spread the love

Punjab Dakh Havaman Andaj 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते.परंतु सध्या राज्यातील हवामान कोरडेच आहे.महाराष्ट्रातील हवामान तज्ञ पंजाबराव डाख यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

तापमानाचा पारा दिवसा खूप वाढलेला दिसत आहे.तसेच रात्री आणि पहाटे तापमान कमी होऊन थंडी जाणवत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असे हवामान तयार झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुणे,कोल्हापूर सारख्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आता नवीन हवामान अंदाज दिला आहे.त्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.Punjab Dakh Havaman Andaj 2023

हे पण वाचा:- या रेशन कार्ड धारकांना सरकार मार्फत मोफत साडीचे वाटप!

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १४ नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होत आहे.तसेच राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी,अक्कलकोट,तुळजापूर, विटा,उस्मानाबाद,लातूर, चिखली,जालना,वैजापूर,माजलगाव,सेलू,परभणी,वसमत, मुंबई,केज,धारूर,अंबाजोगाई,नांदेड,हिंगोली, निजामाबाद, देगलुर,उदगीर या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी सांगितली आहे.

हे पण वाचा:- राज्य सरकारची नवीन योजना नागरिकांना मिळणार मोफत वीज!

याच कालावधी दरम्यान राज्यातील पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भात देखील पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे.तसेच मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे.तसेच दिवाळीनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर अजून वाढेल असा देखील अंदाज त्यांनी दिला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment