Agriculture Irrigation Scheme:- या योजनेच्या अंतर्गत पाच हजार शेततळ्यांना मिळणार अनुदानाचा लाभ,जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Spread the love

Agriculture Irrigation Scheme
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील आधुनिक शेती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवित असते.अलीकडेच महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” सुरू केली आहे.

काय आहे योजना? Agriculture Irrigation Scheme

या योजनेच्या अंतर्गत शेततळे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.राज्यात आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत पाच हजार शेततळ्यांसाठी ३३ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात ज्या भागात पाणी टंचाई असेल अशा भागातील शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ८० टक्के अनुदान दिले जाते.जेणेकरून शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अर्थसहाय्य व्हावे तसेच शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी असा उद्देश या योजनेचा आहे.

अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•शेतीचा सातबारा/आठ-अ उतारा
•बँक पासबुक झेरॉक्स
•जातीचा दाखला
•शेततळ्याची खोदाई पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार तब्बल ४ लाख रुपये अनुदान!

वरील सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेली झेरॉक्स प्रत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या वेबसाईट वर अपलोड करावी लागतात.अर्ज दाखल केल्यानंतर अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाते.योजनेतील पात्र निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले जातात.अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३० दिवसांच्या आत अनुदानाची रक्कम वितरित केली जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी

“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.जेणेकरून DBT द्वारे संबंधित शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळेल.तसेच योग्य लाभार्थी शेतकऱ्यालाच अनुदान मिळेल.योजनेच्या पारदर्शकतेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळून आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्न वाढेल.तसेच शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” विषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळाला भेट द्या.तसेच आपल्या जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधून देखील माहिती घेऊ शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment