Animal Distribution Scheme:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गाय व म्हैस आणि शेळी गट वाटप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ,ही असेल अंतिम मुदत!

Spread the love

Animal Distribution Scheme
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दोन दुधाळ गायी,दोन दुधाळ म्हशी,शेळी व मेंढी गट वाटप,कुक्कुट पक्षी वाटप योजना राबविण्यात येत आहे.राज्यातील पशुपालकांना तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पशू संवर्धनच्या विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आता १८ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.यापूर्वी ही मुदत १५ डिसेंबर २०२३ पर्यंत होती.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत केली जाते.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अधिकचे अनुदान दिले जाते.

हे पण वाचा:- गाय गोठा बांधायचाय? थांबा,सरकार देतय १०० टक्के अनुदान!

योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान
Animal Distribution Scheme

•शेळी गट वाटप योजना:- या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना १० शेळया आणि १ बोकड गट वाटप करण्यात येते.यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७७,५६९ रुपये (७५ टक्के) अनुदान दिले जाते.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५१,७७३ रुपये (५० टक्के) अनुदान दिले जाते.

•मेंढी गट वाटप योजना:- या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना १० मेंढ्या आणि १ नर मेंढा गट वाटप करण्यात येते.यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९६,६३८ रुपये (७५ टक्के) अनुदान दिले जाते.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ६४,४२५ रुपये (५० टक्के) अनुदान दिले जाते.

•दोन दुधाळ गायी/म्हैस वाटप योजना:- या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ गायी/म्हशी खरेदीसाठी अनुदान वितरित करण्यात येते.गाय खरेदीसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना १,१७,६३८ रुपये (७५ टक्के) अनुदान देण्यात येते.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७८,४२५ रुपये (५० टक्के) अनुदान वितरित करण्यात येते.म्हैस खरेदीसाठी १,३४,४४३ रुपये अनुदान वितरित करण्यात येते.

•कुक्कुट पालन योजना अनुदान:- पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून १००० मांसल पक्षी कुक्कुट पालन साठी अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासकीय अनुदानापोटी १,६८,७५०/- रुपये रक्कम दिली जाते.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १,१२,५०० रुपये अनुदान देण्यात येते.

कशामुळे मुदतवाढ देण्यात आली?

पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या शेळी/मेंढी गट वाटप योजना,गाय/म्हैस वाटप योजना, कुक्कुट पक्षी वाटप योजना साठी १८ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.परंतु या योजनेसाठी समाधानकारक अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

अर्ज कुठे करायचा?

पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून पशू वाटप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करता येणार आहे.तसेच मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.त्यासाठी पशू संवर्धन विभागाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

पशु संवर्धन विभागाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment