राज्य सरकारचा मोठा निर्णय,या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार रुपयांची मदत,तुम्हाला पण मिळणार का?

Spread the love

Avkali Anudan
राज्यात नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकाचे नुकसान झाले.त्याबद्दल बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार रुपये ते ३६ हजार रुपयांपर्यंत भरीव मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीबद्दल ही मदत मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत दिली जाते.त्यात केंद्र सरकारचा ७५ टक्के हिस्सा व राज्य शासनाचे २५ टक्के अंशदान असते.राज्यात काही भागात गारपीट व अवेळी पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

त्याबद्दल बाधित शेतकऱ्यांना निकषाच्या बाहेर जाऊन जास्तीची मदत करण्याचा निर्णय १९ डिसेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.त्यानुसार महसूल व वन विभागाने सोमवारी शासन आदेश काढून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे.

हे पण वाचा:- राज्यातील या 22 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता,जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज!

नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीबद्दल पूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती.आता ही मदत तीन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे.

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये,बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल प्रति हेक्टर ३६ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

या पुढेही गारपीट,अवेळी पावसामुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांना याच दराने मदत दिली जाणार आहे,असे या शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment