Cash Deposite Rule
Cash Deposite Rule
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.ही बातमी ज्यांचे बँकेत खाते आहे अशा सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे.आज आपण सोशल मीडियावर बँकेत रक्कम जमा करण्या विषयी व्हायरल होत असलेल्या बातमीबद्दल जाणून घेणार आहेत.
ज्या बातमी मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ग्राहकांसाठी बँकेत जमा ठेवी विषयी नवीन घोषणा केली आहे.या व्हायरल होणाऱ्या बातमीनुसार तुमच्या बँक खात्यात जर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचे खाते बंद केले जाईल.
Table of Contents
RBI Cash Deposite Rule
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने वेळोवेळी नवीन नियमाबद्दल किंवा बँकेच्या कार्य प्रणाली बद्दल विविध नियम जाहीर केले जातात.सोशल मीडियाच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणाऱ्या रकमेविषयी एक मेसेज व्हायरल होत आहे.ज्या मध्ये सांगितले गेले आहे की आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँक खात्यामध्ये ठेवण्यात येणाऱ्या रकमेविषयी एका नवीन नियमाची घोषणा केली आहे.
हे पण वाचा :- हे काम करा अन्यथा बँक खाते होईल बंद!
व्हायरल होणाऱ्या मेसेज मध्ये सांगण्यात आले आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये जर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर बँक खाते बंद करण्यात येईल.या व्हायरल होणाऱ्या मेसेजचे भांडेफोड करत PIB Fact Check यांनी सांगितले की या व्हायरल होणाऱ्या मेसेज मध्ये कोणतेही तथ्य नाही.तो मेसेज खोटा आहे.
PIB ने सांगितले की आरबीआई ने असा कोणताही निर्णय घेतला नाही.PIB ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. PIB च्या ट्विट मध्ये सांगितले आहे की,’ सोशल मीडियावर व्हायरल एका बातमी मध्ये केलेल्या दाव्या नुसार बँक खात्यामध्ये 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचे बँक खाते बंद करण्यात येईल.असा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतला आहे.ही बातमी खोटी आहे.असा कोणताही निर्णय आरबीआई ने घेतला नाही.’
PIB चे बनावट संदेश कसे तपासायचे?
तुम्हाला असा कोणताही संशयास्पद संदेश मिळाल्यास ,ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे तुम्ही तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in या वेबसाईट वर मेसेज करावा लागेल.त्यासाठी येथे क्लिक करा.वैकल्पिकरित्या तुम्ही तथ्य तपासणीसाठी +918799711259 या क्रमांकावर Whats App मेसेज देखील पाठवू शकता.
तुम्ही तुमचा संदेश pibfactcheck@gmail.com या ई मेल आयडी वर देखील पाठवू शकता.तथ्य तपासणी माहिती https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे. त्यासाठी येथे क्लिक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.