Crop Insurance
नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३ बद्दल मोठे अपडेट जाणून घेणार आहोत.राज्यात यावर्षी पावसात पडलेला मोठा खंड शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्या शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आसणार आहे. जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्याचे जाहीर केले आहे.
कोणत्या जिल्ह्याला मिळणार पीक विमा?
Crop Insurance
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.06 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचेकडून पीक विम्या संदर्भात एक अधिसूचना काढण्यात आली आहे.या अधिसूचनेनुसार सोयाबीन,तूर,मका,बाजरी,भुईमूग,कांदा आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्याचे आदेश पीक विमा कंपनीला देण्यात आले आहेत.
सदर आदेशामुळे जिल्ह्यातील 77 महसूल मंडळातील पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम 25% पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पीक विमा मंजूर निकष काय आहेत?
Crop Insurance
सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या २१ दिवसांपासून पावसामध्ये पडलेला खंड लक्षात घेता सरासरीच्या 50% उत्पादन कमी होण्याचे निकष यामुळे शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा (Crop Insurance)मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे?
1)उत्तर सोलापूर
2)दक्षिण सोलापूर
3) माढा
4) बार्शी
5)करमाळा
6)पंढरपूर
7)मोहोळ
8)मंगळवेढा
9)अक्कलकोट
10)सांगोला
पिके आणि समाविष्ट महसूल मंडळे
1.सोयाबीन
तालुका | महसूल मंडळाचे नाव |
१)उत्तर सोलापूर | i)उत्तर सोलापूर तालुका |
२)दक्षिण सोलापूर | i) दक्षिण सोलापूर तालुका |
३)मोहोळ | i) अनगर ii) सावळेश्वर iii) नरखेड |
४)अक्कलकोट | i)अक्कलकोट तालुका |
५)बार्शी | i) आगळगाव ii) नारी iii) पांगरी iv) पानगाव v) उपळे दुमाळा vi) सुर्डी vii) गौडगाव viii) सौंदरे |
2.तूर
तालुका | महसूल मंडळाचे नाव |
१)उत्तर सोलापूर | i) उत्तर सोलापूर तालुका |
२)दक्षिण सोलापूर | i) बोरामाणी ii) वळसंग iii) मुस्ती iv) होटगी v) विंचुर vi) मंद्रूप |
३) मोहोळ | i) नरखेड ii) अनगर iii) शेटफळ iv) टाकळी सिकंदर v) वाघोली vi) कामती बुद्रूक vii) सावळेश्र्वर |
४) अक्कलकोट | i) करजगी ii) जेऊर iii) मैंदर्गी iv) दुधनी v) चपळगाव vi) किणी vii) नागणसुर |
५) बार्शी | i) आगळगाव ii) नारी iii) पांगरी iv) पानगाव v) उपळे दुमाला vi) सुर्डी vii) गौडगांव viii) वैराग ix) सौंदरे |
६) माढा | i) दारफळ ii) कुर्डूवाडी iii) रोपळे क. iv) म्हैसगाव v) टेंभूर्णी vi) नीमगाव टें. vii) बेंबळे viii)माढा ix) लऊळ |
७) करमाळा | i) अर्जुन नगर ii) पोथरे iii) करमाळा iv) कोर्टी v) केम vi) सालसे vii) पांगरे viii) जिंती ix) केत्तुर |
८) पंढरपूर | i) पंढरपूर ii)रोपळे iii) करकंब iv) पट.कुरोली v) चळे vi) पुळुज |
९)मंगळवेढा | i) आंधळगाव ii) मारापुर iii) हुलजंती |
१०)माळशिरस | i) इस्लामपूर ii) सदाशिव नगर iii) अकलूज iv) लवंग |
हे पण वाचा:- भोगवटदार वर्ग -२ च्या जमिनी होणार वर्ग -१
3.बाजरी
तालुका | महसूल मंडळाचे नाव |
१)दक्षिण सोलापूर | i) बोरामणी ii) वळसंग iii) मुस्ती iv) विंचूर v) होटगी vi) मंद्रूप |
२) मोहोळ | i) मोहोळ ii) नरखेड iii) शेटफळ iv) पेनुर v) वाघोली vi) कामती. बु. vii) सावळेश्र्वर viii) टाकळी (सौ) ix) अनगर |
३) अक्कलकोट | i)अक्कलकोट ii) नागणसुर iii) जेऊर |
४)बार्शी | i) आगळगाव |
५) माढा | i) दारफळ ii) कुर्डूवाडी iii) रोपळे (क) iv) म्हैसगांव v) मोडनिंब vi) निमगाव टें. vii) बेंबळे viii)माढा ix) लऊळ |
६)करमाळा | i) अर्जुन नगर ii) पोथरे iii) करमाळा iv) कोर्टी v) केम vi) सालसे vii) जिंती viii) केत्तूर |
७) पंढरपूर | i) भाळवणी ii) रोपळे |
८) मंगळवेढा | i) आंधळगाव ii) मारापूर iii) हुलजंती |
९) माळशिरस | i) इस्लामपूर ii) सदाशिवनगर iii) अकलूज iv) लवंग v) नातेपुते vi) दहिगाव vii) फोंडशिरस |
Table of Contents
4.भुईमुग
तालुका | महसुल मंडळाचे नाव |
१)उत्तर सोलापूर | i) उ. सोलापूर ii) शेळगी iii) तिऱ्हे iv) वडाळा v) मार्डी vi) मजरेवाडी vii) बाळे viii) कोंडी ix) सोरेगाव |
२) दक्षिण सोलापूर | i) बोरामणी ii) वळसंग iii) मुस्ती iv) विंचूर v) होटगी vi) मंद्रूप |
३) मोहोळ | i) मोहोळ ii) नरखेड iii) शेटफळ iv) पेनुर v) वाघोली vi) कामती बु. vii) सावळेश्वर viii) टाकळी (सौ) ix) अनगर |
४) अक्कलकोट | i) अक्कलकोट ii) जेऊर iii) नागणसुर iv) तडवळ v) करजगी vi) दुधणी vii) मैंदर्गी viii) वागदरी ix) चपळगाव x) किणी |
५) बार्शी | i) पानगाव ii) उपळे दुमाला iii) सुर्डी iv) सौंदरे |
६) माळशिरस | i) इस्लामपूर ii) अकलूज iii)नातेपुते |
5.मका Crop Insurance
तालुका | महसुल मंडळाचे नाव |
१) माढा | i)माढा तालुका |
२) करमाळा | i) करमाळा तालुका |
३) पंढरपूर | i) पंढरपूर तालुका |
6.कांदा
तालुका | महसूल मंडळाचे नाव |
१) उत्तर सोलापूर | i) उत्तर सोलापूर |
२) दक्षिण सोलापूर | i) दक्षिण सोलापूर |
३) अक्कलकोट | i) अक्कलकोट तालुका |
४)मोहोळ | i) मोहोळ तालुका |
५) माढा | i)माढा तालुका |
६) करमाळा | i) करमाळा तालुका |
७) पंढरपूर | i) पंढरपूर तालुका |
7. कापुस
तालुका | महसूल मंडळाचे नाव |
१)सांगोला | i) कोळा ii) जवळा iii) घेरडी iv) शिवणे |
२) मंगळवेढा | i) मारापुर |
वरील पिकांसाठी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सोलापूर यांनी 06 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या अधिसूचनेत दिले आहेत.त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.