Bhogvatdar Varg 2:- भोगवटदार वर्ग-२ च्या जमिनी होणार वर्ग -१ कसा आणि कुठे करायचा अर्ज घ्या जाणून!

Spread the love

Bhogvatdar Varg 2

महाराष्ट्र राज्यात आजतागायत बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या भोगवटदार वर्ग क्रमांक -२ मधील आहेत. भोगवटदार वर्ग क्रमांक -२ च्या जमिनी ह्या जरी शेतकरी मालकीच्या असल्या तरी सुद्धा त्या जमिनींचे संपूर्ण अधिकार हे शासनाकडे असतात.सदरच्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या पूर्व समंतीशिवाय विकता येत नाहीत.

आज आपण सदर लेखातून भोगवटदार वर्ग क्रमांक -२ च्या जमिनींचे भोगवटदार वर्ग क्रमांक -१ मध्ये कशे रूपांतरण करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.भोगवटदार वर्ग क्रमांक -२ च्या जमिनी भोगवटदार वर्ग क्रमांक -१ झाल्यावर शेतकऱ्यांना जमिनीचे सर्व अधिकार प्राप्त होतात.शेतकरी सदर जमिनींची रीतसरपणे खरेदी विक्री करू शकतो.

भोगवटदार वर्ग क्रमांक -२ म्हणजे काय?

भोगवटदार वर्ग क्रमांक -२ म्हणजे अशा जमिनी ज्या फक्त कसून खाण्याकरिता शेतकरी वर्गाला शासनाकडून दिल्या जातात.अशा जमिनींचे संपूर्ण मालकी हक्क हे शासनाकडे असतात.त्यामुळे शेतकरी सदर जमिनींचे कसलेही व्यवहार करू शकत नाहीत.

भोगवटदार वर्ग क्रमांक -२ च्या जमिनीमध्ये देवस्थान, इमानी जमीन,वन जमीन, गायरान,पुनर्वसनाच्या जमिनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश असतो.

हे पण वाचा:- गुंठयात जमीन खरेदी विक्री करता येणार, खरेदीसाठी निर्बंध उठवले!

आत्ता आपण पाहूया भोगवटदार वर्ग क्रमांक -१ म्हणजे काय?

भोगवटदार वर्ग क्रमांक -१ च्या जमिनी संपूर्ण शेतकरी मालकीच्या असतात.शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी विक्री करताना शासनाच्या कसल्याही परवानगीची गरज नसते. या जमिनी शेतकऱ्यांना वडिलोपार्जित प्राप्त झालेल्या असतात.

भोगवटदार वर्ग क्रमांक -२ चे भोगवटदार वर्ग क्रमांक -१ मध्ये कसे रूपांतर करायचे?

भोगवटदार वर्ग क्रमांक -२ चे भोगवटदार वर्ग क्रमांक -१ मध्ये रूपांतर करण्यासाठी शेतकऱ्याला त्या जमिनीच्या मुळ बाजार मुल्याच्या 50% रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार आहे.ही रक्कम शासनाकडे जमा केल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग क्रमांक -२ चे भोगवटदार वर्ग क्रमांक -१ मध्ये रूपांतर करण्यात येईल.

अर्ज कुठे करायचा ?

Bhogvatdar Varg 2

शेतकऱ्यांना भोगवटदार वर्ग क्रमांक -२ चे भोगवटदार वर्ग क्रमांक -१ मध्ये रूपांतर करण्यासाठी तहसील कार्यालयात आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.अर्जाचा नमुना पुढील प्रमाणे असणार आहे.

अर्ज नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भोगवटदार वर्ग क्रमांक -२ चे भोगवटदार वर्ग क्रमांक -१ मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1)जमीन मालक यांचा विनंती अर्ज
2)विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
3)जमिनीचे 50 वर्षांचे उतारे व खाते उतारा
4)7/12 उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी
5) एकत्रीकरणाचा मुळ उतारा
6) आकारबंदाची मुळ प्रत
7)मुळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलयात/आदेशाची नक्कल
8)तलाठी यांचेकडील वन जमीन नोंदवहीचा उतारा

वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपला विहित नमुन्यातील अर्ज भरून तहसील कार्यालयात जमा करावयाचा आहे.पुढील कार्यवाही नंतर तहसील कार्यालय आपल्याला संपर्क करेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment