E Pik Pahani
E Pik Pahani
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण ई पीक पाहणी नोंद कशी करायची या बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.शेतकऱ्यांमध्ये ई पीक पाहणी नोंद कशी करायची या बद्दल बरेचशे प्रश्न आहेत.तर त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र सरकार गेल्या 3 वर्षांपासून राज्यात ई पीक पाहणी हा उपक्रम राबवत आहे.सदर उपक्रमांतर्गत शेतकरी स्वतः त्याच्या शेतातील पिकांची नोंद आपल्या सात बारा उताऱ्यावर करू शकणार आहे.
राज्य सरकारने 2023 या वर्षी ई पीक पाहणी नोंद करण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे.चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांची 9 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 1 कोटी 11 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे.
Table of Contents
जे शेतकरी 15 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी करू शकणार नाहीत.अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंद तलाठी कार्यालयाकडून 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाणार आहे.E Pik Pahani
ई पीक पाहणी नोंद कशी करायची?
E Pik Pahani App
शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंद आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून करता येणार आहे.त्यासाठी आपल्या मोबाईल मधील गूगल प्ले स्टोअर वर जाऊन ई पीक पाहणी हे ऍप डाऊनलोड करायचे आहे.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.
ई पीक पाहणी ऍप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
E Pik Pahani App Download
ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर इंस्टॉल करून घ्यायचे आहे. इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे.त्यांनतर सुरुवातीला ई पीक पाहणी नावाचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्याला डावीकडे डावीकडे सरकावयाचे आहे.आता तुमच्यासमोर ऍप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं तुम्हाला दिसेल.
त्यानंतर तुमच्या समोरील पेज पुन्हा एकदा तुम्हाला डावीकडे सरकावयाचे आहे.म्हणजे तुम्हाला पिकांची नोंद करण्यासाठी ज्या गोष्टी जसे की सातबारा उतारा,8-अ उतारा इत्यादी.
E Pik Pahani Online
आता तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे.
पुढे नवीन खातेदार नोंदणी ऑप्शन पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यांनतर तुम्हाला तुमचा महसूल विभाग, तुमचा जिल्हा, तालुका, आणि तुमचे गाव निवडायचे आहे.
हे झाल्यानंतर तुमचे पहिले नाव,मधील नाव किंवा आडनाव आणि खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकणार आहे.त्यानंतर तुमच्या समोर संकेतांक पाठवा नावाचं पेज ओपन होईल.
हे पण नक्की वाचा:- आता पी एम किसान सन्मान निधी 6 हजार रुपयांवरून 8 हजार रुपये होणार
आता तुमच्या समोर आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे,अशी सूचना दिसेल. जर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.E Pik Pahani
तुम्ही जर गेल्यावर्षी पीक पाहणी नोंद केली असेल तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे,तुम्हाला पुढे जायचे का असा मेसेज तिथं येईल.जर तुम्ही प्रथमच या वर्षीची नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज तुम्हाला येणार नाही.
ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथल्या हो या पर्यायावर क्लिक करायचे आहे.आता तुम्हाला ज्या खातेदारांची नोंद करायची आहे त्या खातेदाराचे नाव निवडा.संकेतांक विसरलात या पर्यायावर क्लिक करा आणि नवीन संकेतांक क्रमांक टाका.
आता तुम्ही ई पीक पाहणी ॲपवर तुमच्या शेतातील पिकांची नोंद करू शकता.पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप दाखवले जाईल.
त्यांनतर तुम्हाला ज्या हंगामातील पिकांची नोंद करावयाची आहे तो हंगाम निवडा.त्यानंतर पिकाचा वर्ग जसे की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक आहे किंवा इतर हे निवडायचे आहे.पिकाचा प्रकार,पिकांची नावे आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.E Pik Pahani
ही माहिती भरून झाल्यास तुमच्या पिकाला जल सिंचनाचे कोणते साधन तुम्ही वापरात आहात त्याची माहिती द्यायची आहे.जसे की विहीर,बोअरवेल,बंधारा,तलाव यांपैकी एक निवडायचे आहे.त्यानंतर तुमच्या पिकाची सिंचनाची पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.
त्यानंतर अक्षांश रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर फोटो काढा पर्यायावर क्लिक करून तुमच्या शेतातील पिकाचा फोटो काढायचा आहे आणि तो शेतातूनच अपलोड करायचा आहे.फोटो काढून झाला की बरोबर चिन्हाच्या खुणेवर क्लिक करायचे आहे.
तुम्ही जी माहिती भरली ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. नंतर तुम्हाला त्याखालच्या स्वयंघोषणेवर क्लिक करून पुढे जायचे आहे.पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशी सूचना येईल.ठीक आहे म्हणायचं आहे.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी करू शकणार आहेत.
ई पीक पाहणी नोंद केल्याचे फायदे
E Pik Pahani
१.तुमच्या शेतातील शेतमाल जर तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजनेच्या अंतर्गत विक्री करायचा असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे.
२.तुम्हाला जर बँकेतून पीक कर्ज घ्यावयाचे असेल तर बँक देखील तुम्ही ज्या पिकासाठी कर्ज घेणार आहेत तेच पीक तुमच्या शेतात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ई पीक पाहणी नोंद तपासून पाहते.
३.तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदविलेले पीक आणि ई पीक पाहणीत नोंदवलेल पीक हे सारखेच असले पाहिजे.
४.नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी ई पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.