Electric Motor Pump Yojana
Electric Motor Pump Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आमच्या एमएचखबर वेबसाईटवर आपले स्वागत आहे.आम्ही आज आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या एका योजनेचे माहिती देणार आहोत. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सरकार नेहमीच विविध योजना राबवून प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.
अशाच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विद्युत पंप (Electric Motor Pump Yojana) अनुदान तत्वावर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी नक्कीच हा निर्णय खूप महत्त्वाचा असणार आहे.शेतीतील पिकांचे चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी शेतीला पाण्याची गरज असते.
Table of Contents
शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंपाची गरज भासते.परंतु राज्यातील सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती ही विद्युत पंप खरेदी करण्यासारखी नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी सरकारने विद्युत पंप अनुदान तत्वावर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
किती अनुदान मिळते?
सदर योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते.निवड झालेल्या लाभार्थ्यांना सरकार मार्फत 75% अनुदान दिले जाते.उर्वरित 25% रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागते.अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
हे पण वाचा:- सरकार देतय मुलींना मोफत सायकल
योजनेच्या अटी आणि शर्ती
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी विहीर किंवा बोअरवेल असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.(उत्पन्न मर्यादा 2 लाखापेक्षा कमी) (Electric Motor Pump Yojana)
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
७/१२ उताऱ्यावर विहीर किंवा बोअर ची नोंद असणे आवश्यक.
या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.