Free Cycle Scheme :- सरकार देतय मुलींना मोफत सायकल,असा करा अर्ज!

Spread the love

Free Cycle Scheme

Free Cycle Scheme
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे.आज आपण राज्य सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.महाराष्ट्र राज्य सरकार मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील मुलींना शाळेत जाण्याकरिता मोफत सायकल वाटप योजना राबवित आहे.या योजनेअंतर्गत गरजु मुलींना सायकल घेण्यासाठी सरकार पाच हजार रुपये अनुदान देत आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने 19 जुलै 2011 रोजी राज्यातील गरजु मुलींना मोफत सायकल वाटप करण्यासंदर्भात एक नवीन शासन निर्णय काढला आहे.सदर योजना महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यातील 125 तालुक्यांमध्ये राबविली जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

कोणाला मिळणार लाभ?

राज्यातील ग्रामीण भागातील शाळकरी मुलींना या योजनेचा(Free Cycle Scheme) लाभ घेता येणार आहे.ज्या मुलींच्या घराचे अंतर हे शाळेपासून कमीत कमी 5 किलोमीटर आहे अशा मुलींना शासनाकडून सायकल घेण्यासाठी 5 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येते.

हे पण वाचा:- आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही,घरबसल्या काढा 350/- रुपयांमध्ये

अनुदानाची रक्कम मुलींच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा केली जाते.सदर योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एकच मुलीला घेता येतो.
अनुदानाची रक्कम ही दोन टप्प्यांमध्ये वितरित केली जाते.पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार पाचशे रुपये मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

उर्वरित 1500/- रुपये अनुदानाची रक्कम सायकल खरेदी केल्यानंतर वितरित केली जाते.त्यासाठी सायकल खरेदी केलेली पावती आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतात.

आवश्यक कागदपत्रे

1)मुलीचे आधार कार्ड
2)शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
3)मुख्याध्यापक यांचा शाळा ते घर 5 किलोमीटर अंतर असल्याचा दाखला
4)राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
5)तलाठी किंवा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला(Free Cycle Scheme)

अर्ज कुठे करायचा?

Free Cycle Scheme

सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये भेट द्यावी लागेल.नसेल तर आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment