Electric Scooter | देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर,किंमत फक्त 28 हजार 80 Km ची रेंज!

Spread the love

Electric Scooter
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहेत.ई स्कूटर कमी खर्चात जास्त मायलेज देतात त्यामुळे ग्राहकांची यांना पसंती आहे.आपल्याच देशातील एका इलेक्ट्रिक स्कूटर बनविणाऱ्या कंपनीने अगदी कमी आणि परवडणाऱ्या किमतीत एक इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) लाँच केली आहे.

Avon E Lite असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे.तिची भार वाहून नेण्याची क्षमता ही 100 किलोग्रॅम पर्यंत आहे.तसेच पूर्ण चार्ज केल्यानंतर Avon E Lite 50 किमी पर्यंत चालते.त्यामुळे कमी किमतीत चांगले मायलेज दिल्यामुळे ग्राहकांचा या ई स्कूटर च्या खरेदीकडे कल वाढत आहे.

Avon E Lite स्कूटरचे फिचर्स
बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 8 तास लागतात.तसेच BLDC ची 232 वॅट पॉवरची मोटर या ई स्कूटर मध्ये देण्यात आली आहे.तसेच या ई स्कूटरची किंमत ही फक्त 28 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.त्याचबरोबर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चे फिचर देखील देण्यात आले आहे.

हे पण वाचा:- इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी मिळणार इतक्या रुपयांची सबसिडी

या ई स्कूटर मध्ये दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक ची सुविधा देण्यात आली आहे.त्याचबरोबर दोन्ही चाके ही अलॉय मेटल पासून बनविलेले आहेत.दोन्ही टायर मध्ये ट्यूब असणार आहे.ट्यूबलेस टायरची सुविधा या ई स्कूटर मध्ये देण्यात आली नाही.

Avon E Lite स्कूटर मध्ये ड्राईव्ह फोर मोड-इलेक्ट्रॉनिक पॉवर,इलेक्ट्रॉनिक पॉवर आणि क्रुझ कंट्रोल सह पेडल सहाय्य हे फिचर्स देखील देण्यात आले आहेत.

Hero E-Sprint शी स्पर्धा
Avon E Lite ही स्कूटर Hero E-Sprint(Electric Scooter) ची स्पर्धा करते.Avon E Lite स्कूटरच्या तुलनेत Hero E-Sprint ही एका चार्ज मध्ये 42 किलोमीटर चालते.Hero E-Sprint मध्ये ट्यूबलेस टायर,250 वॅटची बॅटरी,डिस्क ब्रेक,1500 वॅटची BLDC मोटर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment