Electric Scooter Subsidy :- अरे वा! इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यावर मिळणार सबसिडी,पहा शासन निर्णय!

Spread the love

Electric Scooter Subsidy
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवित आहे. त्यासाठी सरकार अक्षय ऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन देत आहे.केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी सबसिडी देत आहे.जेणेकरून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी लोकांची मागणी वाढेल.

इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार खरेदीसाठी सबसिडी
महाराष्ट्र राज्य सरकार लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर(एल १ व एल २),इलेक्ट्रिक तीनचाकी ऑटो(एल २ एम),इलेक्ट्रिक तीनचाकी माल वाहतूक वाहन(एल ५ एन),इलेक्ट्रिक चारचाकी कार(एम १),इलेक्ट्रिक चारचाकी माल वाहतूक वाहन (एन १) आणि इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी सबसिडी देते.

किती मिळते सबसिडी ?
इलेक्ट्रिक स्कूटर पासून ते इलेक्ट्रिक बस पर्यंत प्रत्येक वाहनाला प्रती कीलोवॅट 5000 हजार रुपये सबसिडी दिली जाते.त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावयाचे असल्यास ही माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे.नाहीतर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.Electric Scooter Subsidy

वरील नमूद केलेली अनुदानाची रक्कम ही पहिल्या 1 लाख वाहन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी करून रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी असणार आहे.तसेच ई-तीनचाकी ऑटो साठी पहिल्या 15 हजार ग्राहकांना, ई-तीनचाकी माल वाहतूक वाहन साठी पहिल्या 10 हजार ग्राहकांना, ई-चारचाकी कार साठी पहिल्या 10 हजार ग्राहकांना, ई-चारचाकी माल वाहतूक वाहन साठी पहिल्या 10 हजार ग्राहकांना तसेच ई-बसेस साठी पहिल्या 1 हजार ग्राहकांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

हे पण वाचा:- या कंपनीची ई-स्कूटर बाजारात घालतेय धुमाकूळ,तब्बल 200 Km ची रेंज!

अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.तेव्हाच तुम्हाला अनुदानाची रक्कम मिळणार आहे.त्याचबरोबर सरकार वाहन स्क्रॅप करणाऱ्या वाहन मालकांना देखील अनुदान देणार आहे.Electric Scooter Subsidy

वाहन स्क्रॅप केल्यावरही मिळणार अनुदान
एखाद्या व्यक्तीने आपल्या मालकीचे वाहन स्क्रॅप केल्यानंतर सरकार अशा व्यक्तींना अनुदान देणार आहे.त्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार अनुदानाची रक्कम ही वेगवेगळी असणार आहे.ई-दोन चाकी(एल१ व एल२) वाहनांसाठी 7 हजार रुपये,ई-तीन चाकी(एल५ एम व एल५एन) वाहनांसाठी 15 हजार रुपये तसेच ई-चार चाकी (एम१ व एन १) वाहनांसाठी 25 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment