Electricity:- शेतकऱ्यांनो आपल्या मोटारीला कॅपॅसिटर बसवा अन् ३० टक्के वीज वाचवा!

Spread the love

Electricity
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविलेआहेत,त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो.

परिणामी रोहित्र जळणे,वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते.यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे,तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा (Electricity)मिळावा,यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे,हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे.कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा,रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

ऑटोस्विच’चे धोके काय?

ऑटोस्विचमुळे विद्युत पंपावर भार पडत असतो. ऑटोस्विचचा उपयोग केल्याने रोहित्र जळण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.वीज खंडित होऊन परत आल्यास लोड येऊन कंटेनर जळण्याचा धोका वाढतो.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांनो आपल्या मोटारीचे ऑटो स्विच काढा नाहीतर होणार कारवाई,महावितरणने दिली चेतावनी!

रोहित्र जळण्याच्या घटना वाढल्या

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना “ऑटोस्विच लावले आहेत.त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी, रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे.

ऑटो स्विच काढा नाही तर कारवाई

वारंवार रोहित्र जळण्याच्या घटना वाढल्याने महावितरणने शेतकऱ्यांना ऑटो स्विच काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
सूचना करूनही ऑटो स्विचचा वापर होत असल्यास अशांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येणार आहे.

कॅपॅसिटर बसवा,३० टक्के वीज वाचवा

कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे.कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते.
योग्य विद्युतदाब,केव्हीए मागणी,वीज वापरात जवळपास ३० टक्के बचत आदी फायदे होतात.

ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते.त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटो स्विचचा वापर टाळावा.कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते.योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी,वीज वापरात बचत आदी फायदे होतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment