Finding Borewell Water
Finding Borewell Water
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.पाणी हा मनुष्य जीवनातील सर्वात महत्वाचा घटक.पाणी हे सर्व सजीव सृष्टीसाठी जीवन आहे.त्याचप्रमाणे पाण्याचे आणि शेतकऱ्याचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.
शेती करण्यासाठी पाणी हा महत्वाचा घटक आहे.मग ते जमिनीतील पाणी असो वा पावसाचे पाणी.जमिनीतील पाणी शोधण्याच्या विविध पद्धती देशात अवलंबल्या जातात.जमिनीतील पाण्याच्या स्त्रोतांचा चांगल्या पद्धतीने शोध घेतल्यास बोअरवेल किंवा विहिरीला चांगले पाणी लागते.Finding Borewell Water
जमिनीतील पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी सर्सासपणे दोन पद्धतींचा वापर केला जातो.त्याच दोन पद्धतींची माहिती आज आपण या लेखामधून घेणार आहोत.त्या दोन पद्धती पुढील प्रमाणे.
हे पण वाचा:- अंडी देणाऱ्या १००० कोंबड्यांच्या कुक्कुट पालनासाठी मिळणार 25 लाख रूपये अनुदान
Table of Contents
1.बोअरवेल साठी पाणी पाहण्याची पारंपरिक पद्धत
जमिनीतील पाणी शोधण्यासाठी ही प्राचीन पद्धत पूर्व कालापासुन चालत आली आहे.या पद्धतीमध्ये नारळाचा वापर केला जातो.नारळाची शेंडी काढून तो हातावर ठेवून ज्या जागेवर बोअरवेल घ्यायचा आहे त्या संपूर्ण जागेभोवती फिरवला जाते.ज्या ठिकाणी हातावरील नारळ फिरला जाते.त्या ठिकाणी पाणी असल्याचा अंदाज लावला जातो.Finding Borewell Water
त्याच प्रमाणे जमिनीवरील झाडे आणि काही कीटक देखील पाणी असल्याचा संकेत देतात.वाळवी ज्या ठिकाणी वारूळ उभारते त्या ठिकाणी देखील पाणी असल्याचा अंदाज असतो.तसेच कडुनिंब,नारळ ,ताड आणि खरूज यांसारखी झाडे देखील पाण्याच्या स्त्रोताजवळ वाढतात.त्यामुळे त्या ठिकाणी देखील पाण्याचा अंदाज दिला जातो.
पारंपारिक पद्धतीने जमिनीतील उपलब्ध पाण्याचा फक्त अंदाज लावला जातो.त्या ठिकाणी बोअरवेलला पाणी लागेल की नाही याची शाश्वती नसते.
2.बोअरवेल साठी पाणी पाहण्याची वैज्ञानिक पद्धत
या पद्धतीमध्ये जमिनीत विद्युत प्रवाह सोडून त्या पासून मिळणाऱ्या प्रतिरोधापासून पाण्याच्या खोलीचा आणि उपलब्धतेचा अंदाज लावला जातो.याच पद्धतीला विद्युत प्रतिरोधक सिद्धांत देखील म्हटले जाते.
त्याचप्रमाणे दुसरी एक वैज्ञानिक पद्धत वापरली जाते.या पद्धतीमध्ये ज्या जमिनीत बोअरवेल घ्यावयाचा आहे त्या ठिकाणी 12 किंवा 24 इलेक्ट्रोड जमिनीत गाडून जमिनीची प्रतिमा तयार केली जाते.जमिनीच्या प्रतिमेवरून पाण्याच्या खोलीचा अंदाज लावला जातो.
वैज्ञानिक पद्धतीने जमिनीतील पाण्याची अचूक माहिती मिळते.त्यामुळे बोअरवेलला पाणी लागतेच.पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत वैज्ञानिक पद्धत जमिनीतील पाण्याची अचूक माहिती देते.Finding Borewell Water
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.