Gas Cylinder Insurance:- घरगुती गॅस सिलिंडरची दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई,जाणून घ्या अर्जाची प्रकिया!

Spread the love

Gas Cylinder Insurance
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.घरगुती स्वयंपाक करण्यासाठी घरोघरी चुली ऐवजी गॅसचा वापर वाढला आहे.आजकाल घरोघरी गॅस सिलिंडर वापरूनच स्वयंपाक केला जातो.केंद्र सरकार देखील घरगुती गॅस सिलिंडरसाठी विविध योजना राबवित आहे.परंतु कधी कधी गॅस सिलिंडर मुळे दुर्दैवी घटना देखील घडून येतात.त्यासाठी तुम्हाला गॅस सिलिंडर बाबत विमा कवच पॉलिसी(Gas Cylinder Insurance) बद्दल माहिती असायलाच पाहिजे.

गॅस सिलिंडर विमा कवच

संपूर्ण देशात गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांकडून (OMCs) ग्राहकांना विमा कवच प्रदान केले जाते.यासाठी ग्राहकांनी तेल विपणन कंपन्यांकडे आपली अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे.तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाला कंपनीकडून विमा कवच दिले जाते. यासाठी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.

भरपाई म्हणून किती रक्कम मिळते?
Gas Cylinder Insurance

•गॅस सिलिंडर मुळे झालेल्या दुर्घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीला ६ लाख रुपयांचे विमा कवर देण्यात येते.
•गॅस सिलिंडर मुळे झालेल्या एखाद्या घटनेत ३० लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च केला जातो.दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा कवर देण्यात येते.
•गॅस सिलिंडर मुळे झालेल्या दुर्घटनेत एखाद्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास प्रती घटनेस जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत विमा कवर तेल विपणन कंपन्यांकडून देण्यात येतो.

हे पण वाचा:-प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 ची घोषणा, गॅस सिलिंडर वर मिळणार 400 रुपयांची सूट!

विमा कव्हरसाठी दावा कुठे करायचा?

•आपल्या परिसरात गॅस सिलिंडर मुळे काही दुर्घटना झाल्यास ग्राहकाने संबंधित गॅस वितरकाला कळवावे.
•गॅस वितरकाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर गॅस वितरण कंपनी(OMCs) विमा कंपनीला घटनेची माहिती देते.
•गॅस वितरण कंपनीशी संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या(Gas Cylinder Insurance) तरतुदीनुसार डाव्यांच्या निपटारा बाबत पुढील निर्णय घेते.

विमा कव्हर मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • पोलिस एफआयआर नोंदविल्याची प्रत
 • स्थळ पंचनामा रिपोर्ट
 • वैद्यकीय खर्चाचे बिल
 • दुर्घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आणि पोस्ट मोर्टम रिपोर्ट
 • नुकसान झालेल्या प्रॉपर्टीचे फोटो
 • गॅस वितरकाकडे नोंदणी केलेली पावती
 • गॅस सिलिंडर पासबुक

एलपीजी गॅस सिलिंडर वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

 • घरगुती गॅस सिलिंडर मधून दुसरे गॅस सिलिंडर घरच्या घरीच भरणे टाळले पाहिजे.
 • एलपीजी चे घरगुती गॅस सिलिंडर मध्ये हस्तांतरण थांबविले पाहिजे.
 • गॅससाठी गैर मंजूर किंवा नॉन स्टँडर्ड उपकरणे वापरणे टाळले पाहिजे.
 • रबरी नळीची दिवसेंदिवस झीज झाल्याने त्यामधून गॅस गळती होते त्यामुळे वेळोवेळी रबरी नळी बदलली पाहिजे.
 • गॅस स्टोव्ह मधील ओ रिंग्ज वेळोवेळी बदलल्या पाहिजेत.
 • वापर नसताना रेगुलेटर बंद करून ठेवला पाहिजे.

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वापरणे एकदम सुरक्षित आहे.परंतु त्यासाठी आपण देखील योग्य काळजी घेऊन तसेच त्याचा योग्य वापर करून होणाऱ्या दुर्घटना आपल्याला टाळता येतील. जर दुर्घटना घडलीच तर विमा कव्हर आपल्याला आर्थिक नुकसान भरपाई करण्यास मदत करेल.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री श्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment