Gay Mhais Vatap Yojana:- शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस खरेदीसाठी मिळणार 75 टक्के अनुदान,अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख!

Spread the love

Gay Mhais Vatap Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस वाटप योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील इच्छुक तसेच पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता,कागदपत्रे अर्ज कुठे करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.

काय आहे योजना
Gay Mhais Vatap Yojana

राज्य शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दोन दुधाळ गाई तसेच दोन दुधाळ म्हशींची खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना एच.एफ किंवा जर्सी या संकरित जातींच्या दोन दुधाळ गाय खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.त्यामध्ये गीर,सहिवाल,रेड सिंधी,राठी, थारपारकर,देवनी,लाल कंधारीगवळाऊ व डांगी या देशी जातींच्या गायींचा देखील समावेश करण्यात आला आहे.तसेच मुऱ्हा किंवा जाफराबादी या जातींच्या दोन दुधाळ म्हशींची खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम
Gay Mhais Vatap

१.महिला बचत गट
२.अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
३.सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले
वर नमूद केलेल्या व्यक्तींना उतरत्या क्रमाने योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

Gay Mhais Vatap Anudan

एका गटाची प्रकल्प किंमत किती?
Gay Mhais Vatap Yojana

Gay Mhais Vatap Yojana

पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन दुधाळ गायी व दोन दुधाळ म्हशी यांच्या गट खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.दोन दुधाळ संकरित गायींचा गट खरेदी करण्यासाठी प्रती गाय ७० हजार रुपये या प्रमाणे १ लाख ४० हजार रुपये त्याचबरोबर ३ वर्षांचा विमा आणि १८ टक्के सेवा कर मिळून १,५६,८५० रुपये प्रकल्प किंमत ग्राह्य धरण्यात येणार तसेच दोन दुधाळ म्हशींच्या गट खरेदीसाठी ८० हजार रुपये प्रति म्हैस याप्रमाणे १ लाख ६० हजार रुपये त्याचबरोबर ३ वर्षांचा विमा आणि १८ टक्के सेवा कर मिळून १,७९,२५८ रुपये प्रकल्प किंमत ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- कुक्कुट पालन करण्यासाठी सरकार देत आहे ७५ टक्के अनुदान,ऑनलाईन अर्ज भरणे सुरू!

अनुदानाचे किती पैसे मिळणार?

Gay Mhais Vatap Yojana

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यास एकूण प्रकल्प किमतीच्या ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यास १,१७,६३८ रुपये अनुदान दिले जाणार आहे.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान वितरित करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७८,४२५ रुपये अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

स्वहिस्सा किती भरावा लागेल?
Gay Mhais Vatap Yojana

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाणार असल्याने २५ टक्के रक्कम त्यांना स्वहिस्स्यापोटी भरावी लागणार आहे.त्यासाठी त्यांना ३९,२१२ रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे.तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वहिस्स्यापोटी ५० टक्के रक्कम म्हणजेच ७८,४२५ रुपये भरावी लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
Gay Mhais Vatap Anudan

१.फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२.सातबारा उतारा
३.८ अ उतारा
४.अपत्य दाखला/स्वघोषणा पत्र
५.आधार कार्ड
६.रहिवाशी प्रमाणपत्र
७.बँक खाते पासबुक
८.रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते.)
९.७/१२ उतारा नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र/अथवा जमीन भाडे करारनामा
१०.अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
११.दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
१२.दिव्यांग असल्यास दाखला
१३.बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४.वय-जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५.शैक्षणिक पात्रतेचा दाखला
१६.रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत
१७.प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अर्ज कुठे करायचा?

पशु संवर्धन विभागाच्या अंतर्गत राज्य स्तरावर राबविल्या जाणाऱ्या दुधाळ गायी व दुधाळ म्हैस वाटप योजने साठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले अर्ज पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जाऊन भरणे आवश्यक आहे.तिथे जाऊन सुरुवातीला अर्जदार नोंदणी करावी लागणार आहे.त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.तसेच पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून एक मोबाईल ॲप्लिकेशन देखील लाँच करण्यात आले आहे.तिथून देखील आपण ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत.त्याची देखील लिंक खाली दिलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून दोन दुधाळ गायी आणि दोन दुधाळ म्हशी वाटप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत ही १५ डिसेंबर २०२३ असणार आहे.

गाय व म्हैस वाटप योजनेसाठी अर्जदार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

गाय व म्हैस वाटप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पशु संवर्धन विभागाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment