या जिल्ह्यातील २१५९ घरकुलांना हिरवा कंदील, लाभार्थ्यांची यादी जाहीर,येथे पहा यादी! Gharkul Yadi Dharashiv

Spread the love

Gharkul Yadi Dharashiv
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

या योजनेच्या अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी डोंगराळ भागासाठी १.३० लाख रुपये आणि इतर भागासाठी १.२० लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने २० डिसेंबर २०२३ रोजी एक शासन निर्णय काढून धाराशिव(Gharkul Yadi Dharashiv) जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अंतर्गत २१५९ वैयक्तिक घरकुलांस मान्यता देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वतीने २१५९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांकरिता प्रती लाभार्थी १.२० लाख रुपये याप्रमाणे २५,९०,८०,०००/- रुपये व ४ टक्के प्रशासकीय खर्च (प्रति घरकुल ४८००/- रु.प्रमाणे) १,०३,६३,२००/- रुपये अशा एकूण २६,९४,४३,२००/- रुपये इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे.सदर निधीपैकी तूर्त ६,००,००,०००/- रुपये इतका निधी वितरीत करण्यात येणार असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- या जिल्ह्यातील 1049 लाभार्थ्यांची घरकुल यादी जाहीर,यादीत आपले नाव आहे की नाही असे करा चेक!

लाभार्थ्यांनी करावयाची पूर्तता

१.सर्व लाभार्थी विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

२.ज्या लाभार्थ्यांकडे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नसेल अशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.

३.ज्या लाभार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आहे अशा व्यक्तींनाच लाभ मिळणार आहे.दुसऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही.

४.पात्र लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

६.लाभार्थ्यांचे नाव दुबार झाल्यास सदर नावे वगळण्यात येणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment