रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी,राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त मिळणार आनंदाचा शिधा!

Spread the love

Anandacha Shidha
दिवाळी,दसरा,गुढीपाडव्यासारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ आता २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच शिवजयंती यानिमित्त देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

या आनंदाच्या शिधामध्ये साखर,खाद्यातेल,चणाडाळ,रवा, मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असतील.अवघ्या १०० रुपयांमध्ये या सहा वस्तू दिल्या जाणार आहेत. आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे १ कोटी ६८ लाख शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.१ किलो साखर,१ लिटर खाद्यातेल,चणाडाळ,रवा,मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे सहा वस्तूंचा समावेश आनंदाचा शिधामध्ये असेल.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे,नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

हे पण वाचा:- आता घरबसल्या मोबाईलवरून काढा नवीन रेशन कार्ड तेही अगदी मोफत,कसे काढायचे?जाणून घ्या सविस्तर!

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट द्या.

Leave a comment