आता घरबसल्या मोबाईलवरून काढा नवीन रेशन कार्ड तेही अगदी मोफत,कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर! New Ration Card Online

Spread the love

New Ration Card Online
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत (RCMS) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ई-शधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर शिधापत्रिकेवर योजनेबाबत अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY),प्राधान्य कुटुंब योजना (PHH) व राज्य योजनेंतर्गत APL Farmer,राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (NPH) असे नमूद करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ई-शिधापत्रिका कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक हे गरीब व गरजु कुटुंबातील आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाईन ई-शिधापत्रिका(New Ration Card Online) सुविधेकरीता सेवा शुल्क न आकारता सदर सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

हे पण वाचा:- तुमच्या ग्रामपंचायतला किती निधी आला आणि किती निधी खर्च केला? अशा पद्धतीने घरबसल्या जाणून घ्या तुमच्या मोबाईलवरून!

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या (अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब योजना (PHH)) व राज्य योजनेच्या (आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शेतकरी) अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा निःशुल्क (मोफत) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल.अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरून सदर ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल.

ऑनलाईन रेशन कार्ड कसे काढायचे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment