ऑनलाईन पैसे कमावून श्रीमंत व्हायचंय? गुगल करेल तुम्हाला श्रीमंत,या तीन पद्धती वापरून करा लाखोंची कमाई,तेही घरबसल्या! Google Business Ideas 2024

Spread the love

Google Business Ideas 2024
तंत्रज्ञानाच्या युगाचे गूगल हे एक प्रमुख आधारस्तंभ आहे. आजकाल गूगलच्या माध्यमातून संपूर्ण जगातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळत आहे.गूगलचे वेगवेगळे फिचर्स ज्ञान आणि माहिती मिळवण्याचे स्त्रोत आहेत. गूगल फक्त सेवा आणि माहिती यांच्या पुरतेच मर्यादित नसून अनेक ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.गूगलच्या विविध सेवा आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून चांगले उत्पन्न अर्थात पैसे कमावले जाऊ शकणार आहेत.या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गूगलच्या तीन पद्धतींबद्दल माहिती सांगणार आहेत.ज्यामुळे तुम्ही घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहेत.

Google Affiliate Marketing

गूगलचा हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे ब्लॉगर्स आणि वेबसाईट असलेल्या व्यक्तींना पैसे कमाईची संधी उपलब्ध करून दिली जाते.या सेवेच्या माध्यमातून इतर कंपन्यांच्या उत्पादनाचा किंवा सेवांचा प्रचार आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून करण्यास अनुमती देते.तुमच्याकडे कोणत्याही कंपनीच्या उत्पादनांची URL (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) असल्यास तुम्ही ती आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकणार आहेत. जेव्हा तुम्ही शेअर केलेल्या URL च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने एखादे उत्पादन विकत घेतल्यास तुम्हाला कंपनीकडून कमिशन दिले जाते. Google Business Ideas 2024

या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण कोणताही खर्च न करता चांगले उत्पन्न मिळवू शकता.सोशल मीडिया मार्केटिंगच्या युगात ही एक लोकप्रिय आणि प्रभावशाली पद्धत आहे.यामुळे जाहिरात करणाऱ्या व्यक्तिला आणि प्रकाशक अशा दोघांनाही चांगलाच फायदा होतो.

हे पण वाचा:- ग्रामीण भागात १० हजार रुपयांत हे व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवा!

Google Cloud Platform

Google च्या माध्यमातुन प्रदान करण्यात आलेली ही एक सर्वसमावेशक क्लाउड संगणन सेवा आहे.या सेवेचा वापर करून तुम्हाला तुमची वेबसाईट,मोबाईल किंवा एखादे वेब ॲप्लिकेशन अतिशय योग्य आणि विश्वासार्हतेने चालवण्याची सेवा मिळते.या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध सेवा पुरविल्या जातात जसे की संगणकीय शक्ती, स्टोरेज सोल्युशन्स आणि नेटवर्किंग क्षमता.ही सेवा व्यावसायिकांसाठी खूप कमी गुंतवणुकीमध्ये प्रदान केली जाते.

Google Services

ही एक प्रकारची सर्वेक्षण करण्याची सेवा आहे.या सेवेच्या माध्यमातून व्यापारी आणि उत्पादन कंपन्या यांच्या उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल सर्व सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आणि मते जाणून घेतली जातात.जेव्हा व्यापारी किंवा संस्था त्यांच्या उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल एखादे सर्वेक्षण तयार करते तेव्हा त्यासाठी ते Google सेवांना पैसे देतात.त्यानंतर गूगल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म कडून ते सर्वेक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवते.जेव्हा हे सर्वेक्षण एखाद्या व्यक्तीकडून पूर्ण केले जाते तेव्हा त्या संबंधित व्यक्तिला Google कडून आर्थिक बक्षीस म्हणून पैसे देण्यात येतात.

तर मित्रांनो Google कडे असे बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकणार आहेत.परंतु मित्रांनो कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे सातत्य आणि संयम ह्या दोन गोष्टी असणे खूप आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment