Village Business Ideas
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारित होण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरणार आहे.त्यासाठी आम्ही तुम्हाला आजच्या या लेखामधून ग्रामीण भागात करता येण्यासारख्या व्यवसायांची माहिती देणार आहेत.अगदी कमी भांडवलात आपण हे व्यवसाय ग्रामीण भागात सुरू करू शकणार आहेत.त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल.
Table of Contents
तुम्ही अगदी कमी म्हणजे १० हजार रुपयांमध्ये देखील हे छोटे व्यवसाय सुरू करू शकणार आहेत.यासाठी तुम्हाला जास्त जागेची देखील गरज पडणार नाही.तसेच तुम्ही तुमच्या घरातून देखील हे व्यवसाय चालवू शकणार आहेत. चला तर मित्रांनो जाणून घेऊ या कमी भांडवलात ग्रामीण भागात कोणते छोटे व्यवसाय small business ideas चालू करायचे.
स्नॅक्स सेंटर
Small Business Ideas
आजकाल ग्रामीण भागामध्ये देखील बाहेरील पदार्थ खाण्याकडे लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.शहारा प्रमाणे ग्रामीण भागात देखील लोकांना फास्ट फूड चांगलेच आकर्षित करीत आहे.स्नॅक्स फूड खाण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढत चालला आहे.यासाठी आपल्याकडे चांगल्या प्रकारचे स्नॅक्स पदार्थ बनविण्याची कला असेल तर आपण देखील ग्रामीण भागात हा व्यवसाय करू शकता.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम क्वालिटी आणि दर्जेदार चव दिल्यास आपले ग्राहक अजून वाढतील.यासाठी आपल्याला कोणत्याही जाहिरातीवर खर्च करण्याची गरज पडणार नाही.तुम्ही दर्जेदार चव,उत्तम क्वालिटी आणि स्वच्छ्ता या गोष्टींवर लक्ष दिल्यास आपल्याकडे येणारे ग्राहकच आपल्या स्नॅक्स सेंटरची जाहिरात करतील.Village Business Ideas
हे पण वाचा:- आता गूगल पे वरून लोन मिळवा,तेही कोणत्याही कागद पत्रांशिवाय!
मेस पुरविण्याचा व्यवसाय Village Business Ideas
धावपळीच्या जीवनात काही लोकांना नोकरीनिमित्त किंवा शिक्षणासाठी आपले घर सोडून बाहेर राहावे लागते.आपण रहात असलेल्या ठिकाणी जर घर सोडून नोकरी करणारे, शालेय विद्यार्थी राहत असतील तर आपण त्यांना टिफीन पुरविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग अशा लोकांकडे स्वतः अन्न तयार करून खायला वेळ नसल्याने त्यांना मेस लावण्या शिवाय दुसरा पर्याय नसतो.अशाच लोकांची गरज ओळखून तुम्ही मेसचा व्यवसाय सुरू केल्यास त्यातून देखील चांगला नफा तुम्ही मिळवु शकणार आहेत.या व्यवसायामध्ये देखील तुम्ही क्वालिटीला महत्त्व दिल्यास तुमचा व्यवसाय देखील चांगला भरभराटीला येऊ शकणार आहे.
बेकरी शॉप व्यवसाय
लोकांची बदलत चाललेली जीवनशैली आणि बदलत चाललेल्या खाण्या पिण्याच्या गरजा लक्षात घेऊन एखादा व्यवसाय सुरू केल्यास त्या व्यवसायामधून कमी कालावधी मध्ये चांगला नफा मिळू शकतो.पूर्वी ग्रामीण भागामध्ये कोणाच्या तरी घरी वाढदिवसाला केक आणला जायचा. परंतु आजकाल वाढदिवस तसेच कोणत्याही शुभ प्रसंगी केक कापण्याची प्रथा वाढत चालली आहे.या मधून बेकरी व्यावसायिकाला चांगलाच फायदा देखील होत आहे.ग्रामीण भागात देखील आता बेकरी उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.बेकरी उत्पादनांबरोबरच इतर देखील फराळाचे पदार्थ, नाष्ट्याचे पदार्थ देखील बेकरी शॉप मधून विक्री केले जाऊ शकतात.आपण एखाद्या बेकरी चेनची फ्रँचायझी घेऊन देखील हा व्यवसाय ग्रामीण (village business ideas) भागामध्ये उत्तम प्रकारे सुरू करू शकता.
स्टेशनरी शॉप
Village Business Ideas
लोकांना आजकाल दैनंदिन जीवनात स्टेशनरी वस्तूंची गरज पडतेच पडते.शालेय विद्यार्थी,ऑफिस मध्ये काम करणारे लोक,घरातील स्त्रिया,लहान मुले यांना स्टेशनरी दुकानातील वस्तूंची गरज लागत असते.आपण आपल्या गावातील शाळा,कॉलेज समोर स्टेशनरी दुकान सुरू करू शकता.आपण आपल्या घरातूनच हा व्यवसाय सुरू करू शकता.आपल्याला या व्यवसायामधून १२ ही महिने नफा मिळणार आहे.या व्यवसायात मार्जीन खूप जास्त असल्याने आपल्याला चांगला नफा मिळणार आहे.
कपड्यांचे दुकान
आपण आपल्या ग्रामीण भागात कपड्यांचे दुकान सुरू करून देखील चांगला व्यवसाय करू शकता.हा व्यवसाय आपण आपल्या घरातून देखील करू शकणार आहेत. ग्रामीण भागातील लोकांना कपडे खरेदी करण्यासाठी शहराकडे येणे शक्य नसल्याने अशी लोकं ग्रामीण भागातच कपडे खरेदी करण्याला प्राधान्य देतात.जर तुमच्याकडे कपडे शिवण्याची कला असेल तर तुम्ही या व्यवसायामधून देखील चांगली कमाई करू शकणार आहेत.यासाठी तुम्हाला खूप कमी भांडवलाची गरज भासते.अगदी नगण्य भांडवलात देखील हा व्यवसाय तुम्ही करू शकणार आहेत.
तर मित्रांनो वर नमूद केलेले काही व्यवसाय आपण आपल्या ग्रामीण भागात राहून देखील सुरू करू शकणार आहेत.असे अजून बरेच व्यवसाय आहेत जे आपण कुठेही सुरू करू शकणार आहेत.काही ऑनलाईन पद्धतीने केले जाणारे देखील व्यवसाय आहेत ज्या मध्ये कुठल्याही प्रकारच्या भांडवलाची गरज पडत नाही.आपण पुढे आणखी काही व्यवसायांबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.नवनवीन बिझनेस विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.