Loan on Google Pay :- आता गूगल पे वरून मिळवा कर्ज कोणत्याही कागदपत्रांशिवाय,अशा प्रकारे करा अर्ज!Apply Now

Spread the love

Loan on Google Pay
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपण विविध प्रकारचे युपीआय ॲप्लिकेशन वापरत असतो. अनेक लोकांकडे फोन पे,गूगल पे,भीम युपीआय,पेटीएम सारखी ॲप्लिकेशन आहेत.ऑनलाईन ॲप्लिकेशन मुळे पैशाचा व्यवहार करणे सोपे झाले आहे.आता गूगल पे सारखे ॲप्लिकेशन आणि डीएमआय फायनान्स यांनी मिळून छोट्या व्यावसायिकांसाठी गूगल पे सॅशे कर्ज सुरू केले आहे.

आजकालच्या काळात लोकांमध्ये लहान आणि सोपी परतफेड असलेल्या कर्जांची मागणी जास्त आहे.आणि हीच बाब गूगल इंडियाने लक्षात घेऊन व्यावसायिकांसाठी लगेच उपलब्ध होणारी लहान कर्जे तसेच सोप्या पद्धतीने परतफेड असणारे सॅशे कर्ज गूगल पे(Loan on Google Pay) ने सुरू केली आहेत.कर्जाची रक्कम ही 15 हजार रुपयांपासून सुरू होते तसेच परतफेड 111 रुपये एवढ्या छोट्या हप्त्याने केली जाते.

व्यावसायिकांना गूगल पे द्वारे दिली जाणारी सॅशे कर्जे घेण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या गूगल पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.या साठी कोणत्याही कागदपत्रांची गरज लागत नाही.कर्ज प्रकरण जमा झाल्यानंतर लगेच कर्जदाराच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.कर्जाच्या हप्त्याची परतफेड देखील ऑटोमॅटिक होते.त्यामुळे हप्ता भरण्याचे देखील टेन्शन राहत नाही.

हे पण वाचा:- बँक ऑफ इंडिया कडून मिळवा 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज.

गूगल पे द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाचे फायदे

१.कर्ज घेण्यासाठी कुठेही हेलपाटे मारण्याची गरज नाही.
२.मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार
३.कर्जाची रक्कम ही कमीत कमी 15 हजार रुपये आहे.
४.सॅशे कर्ज घेण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज पडत नाही.
५.तात्काळ मंजुरी मिळून पैसे लगेच बँक खात्यात जमा केले जातात.
६.कर्जाची परतफेड ही एकदम सोपी आहे.फक्त 111 रुपये एवढ्या छोट्या हप्त्यांमध्ये परतफेड केली जाऊ शकते.

गूगल पे वर सॅशे कर्जासाठी अर्ज कसा करायचा?

१.तुमच्या मोबाईल मधील गूगल पे ॲप्लिकेशन ओपन करावे लागेल.
२.ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर ‘Business Loans’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
३.त्यानंतर तुम्हाला ‘Apply’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
४.त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
५.तुम्ही कर्जासाठी केलेल्या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात तात्काळ जमा केली जाणार आहे.

अशा प्रकारे तुम्ही गूगल पे वरून सॅशे कर्जे तुमच्या मोबाईलवरून घेऊ शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment