Honda Activa Ev
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे.लोकांमध्ये बहुचर्चित असलेली होंडाची ॲक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच करण्यात आली आहे.जपान येथे झालेल्या मोबिलिटी शो मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर Honda Sc-e लाँच करण्यात आली आहे.
Table of Contents
होंडाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत म्हणजे या स्कूटर मध्ये दोन स्वॅप करण्यायोग्य बॅटरी देण्यात आल्या आहेत, ज्यांना होंडा मोबाईल पॉवर पॅक म्हणतात.त्यामुळे ग्राहकांना बॅटरी चार्ज करण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे.
सदरच्या Honda SC-e मध्ये दिलेल्या दोन बॅटरी मुळे ग्राहकांची चार्जिंगची चिंता मिटली आहे.दोन बॅटरी असल्याने एक बॅटरी चार्ज करुन दुसरी बॅटरी बदलता येणार आहे त्यामुळे बॅटरी चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग पॉइंट जवळ थांबण्याची गरज पडणार नाही.
Honda Activa Ev फिचर्स
Honda SC-e इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2500w ची पॉवरफुल मोटर देण्यात आली आहे.त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरचा 6 सेकंदात 0 ते 45 किमी प्रतीतास वेग वाढविता येतो.तसेच ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 65 किलोमीटर पर्यंत धावू शकते.ही इलेक्ट्रिक स्कूटर स्टँडर्ड आणि डिलक्स अशा दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आली आहे.
हे पण वाचा:- इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी मिळणार इतक्या रुपयांची सबसिडी
Honda SC-e इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.5kwh क्षमतेच्या बॅटरी पॅक देण्यात आला आहे.त्याची रेंज 80 किलोमीटर पर्यंत वाढवते.आणि डबल बॅटरी स्वॅप देण्यात आल्यामुळे ग्राहकांना चार्जिंगची चिंता करण्याची गरज भासत नाही.
Honda Activa Ev किंमत
जपान येथील मोबिलिटी शो मध्ये लाँच करण्यात आलेल्या होंडा ॲक्टीवा इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ही जपानच्या स्थानिक चलन Yen नुसार ¥3,48,000 ठेवण्यात आली आहे.भारतीय रुपयांमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ही 2 लाख रुपयांपर्यंत आहे.
होंडा कंपनी लवकरच भारतात SC-e लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.त्यामुळे ग्राहकांना होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.