घरामध्ये किती रोख रक्कम ठेवता येते? काय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम? जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

RBI Rule About Cash
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने सुरू आहे.देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. रोख रकमेच्या व्यवहारावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत.त्यामुळे आता रोख रकमेचा वापर कमी झाला आहे. यूपीआय पेमेंट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया अजून सोपी झाली आहे.

फोन पे,गूगल पे,पेटीएम सारखे युपीआय ॲप्लिकेशन वापरून तसेच क्यूआर कोड स्कॅन करून व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे.त्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता येऊ लागली आहे.तसेच रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना देखील कमी झाल्या आहेत.

परंतु काही ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यासाठी रोख रकमेचा वापर केला जात आहे.काही लोकांना ऑनलाईन पेमेंट करणे शक्य होत नाही असे लोक रोख रकमेचा वापर करताना दिसून येत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रोख रकमेच्या बाबतीत काही नियम तयार केले आहेत. त्यामुळे भारतात एखादा व्यक्ती घरामध्ये किती रोख रक्कम ठेवू शकतो?हा प्रश्न उपस्थित नेहमी उपस्थित केला जातो.तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे पण वाचा:- ३१ डिसेंबर पर्यंत ही ५ सरकारी कामे उरकून घ्या नाहीतर होईल आर्थिक नुकसान, येईल पश्र्चातापाची वेळ!

काय आहे आयकर विभागाचा नियम?

भारतीय आयकर विभागाने एखादी व्यक्ती स्वतः जवळ किती रोख रक्कम बाळगू शकतो याबद्दल कुठलाही नियम तयार केलेला नाही.त्यामुळे तुम्ही आपल्याजवळ कितीही मोठी रक्कम ठेवू शकणार आहेत.परंतु तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या पटीत आयकर (Income Tax) भरावा लागणार आहे.

तुमच्याकडे असलेली रोख रक्कम तुम्ही कायदेशीर मार्गाने कमावलेली असेल तसेच त्याबद्दलचे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही.जर तुमच्याकडे असलेल्या रोख रकमेची माहिती तुम्ही देऊ शकत नसाल तर मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

एखाद्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळून आली असेल तर त्या रकमेचा स्त्रोत कोणता आहे याची माहिती आयकर विभागाला संबंधित व्यक्तीने देणे गरजेचे आहे.जर संबंधित व्यक्ती रकमेची योग्य माहिती देऊ शकली नाहीतर मात्र त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे.

अवैध मार्गाने मिळवलेल्या रोख रकमेच्या बाबतीत आयकर विभागाने जप्ती आणल्यास त्या रकमेच्या १३७ टक्के एवढा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जप्त केलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी केली जात नाही.त्यामुळे आपल्याकडे असलेल्या रोख रकमेविषयी आवश्यक ती कागदपत्रे आणि योग्य स्त्रोत असणे आवश्यक आहे.अशा परिस्थितीमध्ये आपण करोडो रुपये आपल्या घरात ठेवू शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment