या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला मिळतील २ लाख रुपये,तेही १ दिवसात बँक खात्यात जमा होणार!

Spread the love

भारतीय स्टेट बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Bank) आपल्या ग्राहकांसाठी मोफत मोठा लाभ देत आहे. बँकेच्या माध्यमातून बँकेचे ग्राहक असलेल्या लोकांना २ लाख रुपयांचा विमा मोफत दिला जात आहे.त्यासाठी बँकेच्या ग्राहकांना एकही रुपया भरण्याची गरज पडणार नाही.

केंद्र सरकारच्या माध्यमातून २०१४ साली संपूर्ण देशात प्रधानमंत्री जन धन योजना(PM Jan Dhan Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिकांना बँकेत मोफत बचत खाती उघडता येणार आहे.त्याचसोबत क्रेडिट, विमा संरक्षण या सुविधा देखील देण्यात येणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ज्या ग्राहकांनी प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अंतर्गत बचत खाती उघडली आहेत अशा ग्राहकांना रूपे (SBI Rupay Card) कार्डची सुविधा पुरवली जात आहे.सदरच्या रूपे कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हे पण वाचा:- जर तुम्ही फक्त २० रुपये भरले तर तुम्हाला २ लाख रुपयांचा फायदा मिळेल…तुम्हाला केंद्राच्या या योजनेबद्दल माहिती आहे का?

प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अंतर्गत रूपे कार्डधारक असणाऱ्या बँकेच्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण (Accidental Insurance Cover) सुविधा देण्यात येत आहे.तसेच रूपे कार्डधारक ग्राहक आपल्या बचत खात्यातील रक्कम देखील एटीएम मशीन मधून काढू शकणार आहेत.

ज्या ग्राहकांचे बेसिक सेव्हिंग खाते(बचत खाते) आहे अशा ग्राहकांना त्यांचे खाते प्रधानमंत्री जन धन योजना खात्यात ट्रान्स्फर करण्याची सुविधा देखील आहे.तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीय व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

जे ग्राहक प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अंतर्गत २८ ऑगस्ट २०१८ पूर्वी रूपे कार्डधारक असतील अशा व्यक्तींना १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.तसेच २८ ऑगस्ट २०१८ नंतर प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अंतर्गत रूपे कार्डधारक व्यक्तिंना २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

जर प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत रुपे कार्ड धारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास नामांकित केलेल्या व्यक्तीच्या दोन दिवसात लाभाची रक्कम सदर व्यक्तीच्या खात्यात जमा केली जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment