Income Tax Rules for Saving Account
आज देशातील प्रत्येक व्यक्तीचे एक तरी बचत बँक खाते आहे.बचत खात्यात ठेवलेल्या रकमेवर संबंधित व्यक्तिला व्याज मिळत असते.पण बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरही आयकर आकारला जातो हे तुम्हाला माहितीये का? त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी आपल्या खात्यात किती रक्कम ठेवली पाहिजे म्हणजे मिळणाऱ्या व्याजावर कर लागणार नाही.हा कॉमन प्रश्न सर्वांच्या मनात तयार होतो. आजच्या या लेखाच्या माध्यमातून याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहेत.
देशातील प्रत्येक व्यक्तिला बँकिंग सुविधेखाली आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत.त्यामुळे अनेक लोक या योजनांचा फायदा घेण्यासाठी बँकेत आपली खाती उघडत आहेत. त्याशिवाय आजकाल डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण त्यामुळे देखील प्रत्येक व्यक्तीकडे एक तरी बँक खाते आहेच.परंतु बँकेत खाते उघडताना तुम्हाला दोन पर्याय मिळतात.एक म्हणजे बचत खाते आणि दुसरे म्हणजे चालू खाते.या दोन्ही खात्यांचे स्वतंत्र फायदे आणि तोटे आहेत.
बचत खात्यात किती रक्कम जमा करू शकता
नोकरदार वर्ग,कामगार वर्ग,शेतकरी असे विविध क्षेत्रातील नागरिक केलेल्या कष्टाची कमाई भविष्यासाठी आपल्या बचत बँक खात्यात जमा करीत असतात.त्यामुळे त्यांना सुरक्षिततेची हमी आणि त्या रकमेवर व्याज देखील मिळते. परंतु अनेक नागरिकांना हाच प्रश्न पडतो की बचत खात्यात किती रक्कम जमा करते.पण बचत बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.त्यामुळे तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही जमा करू शकणार आहेत.पण एक गोष्ट काळजीने लक्षात घ्यायला पाहिजे की आयकर विभागाच्या कक्षेत जेवढी रक्कम येते तेवढीच रक्कम तुम्ही बँक खात्यात ठेवली पाहिजे.जर तुम्ही यापेक्षा जास्त रक्कम ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल.
बचत खात्यासाठी आयकर विभागाचा नियम
Income Tax Rules for Saving Account
जेव्हा एखादी व्यक्ती आपला इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या प्रत्येक उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते.अशा परिस्थितीमध्ये बचत खात्याची देखील माहिती द्यावी लागते.जेणेकरून आयकर विभागाला संबंधित व्यक्तीला बचत खात्यातून किती व्याज मिळते याची माहिती मिळेल. त्यामुळे बचत खात्यातून मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते.ज्यावर टॅक्सस्लॅब नुसार कर भरावा लागतो.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या नावावर बचत बँक खात्यात १० लाख रुपये असतील आणि त्या व्यक्तिला वार्षिक १० हजार रुपये व्याज मिळत असेल तर त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न १०,१०,०००/- रुपये मानले जाईल.अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीकडे रोख १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर याची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक असणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.