Kadba Kutti Machine Yojana:- कडबाकुट्टी साठी मिळणार अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू,आजच अर्ज करा!

Spread the love

Kadba Kutti Machine Yojana

Kadba Kutti Machine Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट वर आपले स्वागत आहे.आज आपण जिल्हा परिषदेच्या एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत.जिल्हा परिषदेमार्फत सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांसाठी उचललेले पाऊल नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारे ठरणार आहे.जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना कडबाकुट्टी मशीनचे (Kadba Kutti Machine Yojana) अनुदान तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.त्याचबरोबर सायलेज बॅग देखील अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.

किती अनुदान दिले जाणार?

शेतकऱ्यांना कडबाकुट्टी आणि सायलेज बॅग साठी जिल्हा परिषदेमार्फत 50% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उर्वरित 50% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

दुष्काळजन्य परिस्थिती मध्ये जिल्हा परिषदेमार्फत कडबा कुट्टी आणि सायलेज बॅग चे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.त्यामुळे हिरवा चारा मूरघास बनवून सायलेज बॅग मध्ये साठवून ठेवण्यात मदत होणार आहे.

हे पण वाचा:- विद्युत पंपासाठी मिळणार 75% अनुदान

सायलेज बॅग मुळे चाऱ्यची गुणवत्ता वाढणार आहे. त्यामुळे जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस दूध उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.तसेच शेतकऱ्यांच्या नफ्यात देखील वाढ होणार आहे.

2 एचपी क्षमता असलेल्या विद्युत मोटारीसहित कडबा कुट्टी साठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50% अनुदान किंवा 13000/- रुपये यांपैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून निवड होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येईल.

तसेच 500 किलोग्रॅम साठवणूक क्षमतेच्या जास्तीत जास्त सहा मूरघास (सायलेज)बॅगेसाठी किंमतीच्या 50% अनुदान किंवा 1800/- रुपये यांपैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून निवड होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येईल.

अर्ज कुठे करायचा?

सदरची योजना ही जिल्हा परिषद सातारा ‘सेस’ अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी आपले अर्ज 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या पंचायत समिती कार्यालयात करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी केले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment