Kanda Anudan 2023 :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,कांद्याला मिळणार प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान!

Spread the love

Kanda Anudan 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने शासन निर्णय काढून आनंदाची बातमी दिली आहे.राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार आणि पणन विभागाने तसा शासन निर्णय जाहीर केला आहे.

शासन निर्णय Kanda Anudan 2023

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती,खाजगी बाजार समिती,थेट पणन अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार पात्र शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे एकूण ५५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.या रकमेपैकी ८४ कोटी ०१ लाख रुपये इतकी उर्वरित रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ
Kanda Anudan 2023

खरीप हंगामातील १ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीतील विक्री केलेल्या लाल कांद्यास प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे.ही खरेदी नाफेडने केली आहे.कांदा अनुदानासाठी राज्य सरकारने ५५० कोटी रुपये इतका निधी पूरक मागणीद्वारे पावसाळी अधिवेशनात मंजूर केला आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,कांदा चाळीच्या अनुदान रकमेत इतक्या रुपयांची वाढ!

या शेतकऱ्यांना नाही मिळणार लाभ

सदर कांदा अनुदानासाठी ५५० कोटी रुपये इतकी रक्कम सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी ४६५.९९ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास यापूर्वी वित्त विभागाने मान्यता प्रदान केली होती.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला लाल कांदा १ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधी मध्ये विकला आहे आणि त्यांना यापूर्वी अनुदानाचा लाभ मिळाला आहे.अशा शेतकऱ्यांना आता दुबार अनुदान वितरित होणार नाही.तसेच अपात्र लाभार्थ्यांना देखील अनुदान दिले जाणार नाही.

कांदा अनुदान शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment