शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,आता कांदा चाळीच्या अनुदान रकमेत इतक्या रुपयांची वाढ! Kanda Chal Anudan Yojana

Spread the love

Kanda Chal Anudan Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. परंतु कांदा साठविण्याठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावा लागतो.कांद्याचे उत्पादन हंगामात येते.मागणी मात्र वर्षभर सारखीच असते.कांद्याचे पिक निघाल्यावर मागणी नसल्यामुळे बाजारात कांद्याचा भाव पडतो.याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.

काही वेळा शेतकरी कांदा रस्त्यावर टाकल्याची बातमी येते. याचा फटका जनतेला पण पडतो कारण अशा पध्दतीने कांदा फेकला गेल्यावर बाजारात कांद्याचा तुटवडा होऊन तो महाग होतो.त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याच्या बाजार भावातील चढ-उत्तार पासून सुरक्षा,स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

शासन निर्णय निर्गमित

कांदा ही एक जिवंत वस्तू आहे.तिचे मंदपणे श्वसन चालू असते.तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते.त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यास ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट,कांद्याची सड व कोंब येणे इ.कारणांमुळे होते.त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी कांदाचाळच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक आहे.Kanda Chal Anudan Yojana

त्याअनुषंगाने कांदा पिकासंदर्भात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदा साठवणूक गोदाम म्हणून कांदाचाळ उभारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील अकुशल कामगारांना रोजगार मिळावा तसेच शेतकऱ्यांना देखील फायदा व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ,6 हजार ऐवजी मिळणार 8 हजार रुपये!

कांदा चाळीसाठी मिळणारे अनुदान
Kanda Chal Anudan Yojana

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कांदाचाळ प्रकल्प उभारणीकरिता अकुशल कामगारांच्या मजुरीसाठी ९६,२२०/- रुपये आणि साहित्य खरेदीसाठी मजुरी खर्चाच्या ४० टक्के म्हणजेच ६४,१४७/- रुपये असे एकूण १,६०,३६७/- रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment