महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्जमाफी,६ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी होणार,पहा काय म्हणाले मुख्यमंत्री? Karjmafi Yojana

Spread the love

Karjmafi Yojana
महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. राज्यातील मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांनी मागणी लावून धरली होती.याच मागणीला काही प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की,धान पिकाच्या नुकसान भरपाई साठी असलेली मर्यादा वाढविण्यात येत आहे.सुरुवातीला धान पिकाच्या नुकसानीपोटी हेक्टरी १५ हजार रुपये मदत देण्याची तरतूद होती.हीच मर्यादा आता २० हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल देखील एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कृती दलाचे पुनर्गठन केले जाणार आहे.तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे(Karjmafi Yojana) पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

हे पण वाचा:- या जिल्ह्यासाठी 1049 लाभार्थ्यांची घरकुल यादी जाहीर,यादीत आपले नाव आहे की नाही असे करा चेक!

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.त्यामुळे राज्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा नाही त्यांना लवकरच हा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आणि अपात्र असतील याची सविस्तर माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही.त्यामुळे येत्या काही काळात योजनेच्या पात्र आणि अपात्र लाभार्थी यांच्या बाबतीत शासन निर्णय काढण्यात येऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment