Land Records Pune Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या भूमिअभिलेख विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील साडेचार हजार गावातील तब्बल साडे सात लाख शेतकऱ्यांचे सातबारा उतारे बंद केले जाणार आहेत.शेतकऱ्यांचे सातबारा उतारे बंद करून भूमिअभिलेख खाते राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देणार आहे.असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परंतु राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार नसल्याचे भूमिअभिलेख खात्याने सांगितले आहे. जी गावे शहरांच्या लगत आहेत अशाच गावातील शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.
महाभुमिअभिलेख विभागामार्फत शेतकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड बनविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.राज्यातील पुणे महसूल विभागातील 1242 गावातील शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.तसेच प्रॉपर्टी कार्ड संदर्भातील प्रक्रिया ऑफलाईन राहणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाने सांगितले आहे.Land Records Pune Maharashtra
हे पण वाचा:- आपल्या गावतील खरेदी विक्री व्यवहार आता पहा आपल्याच मोबाईलवर
राज्यातील शहरालगत असलेल्या नागरी भागातील बिगर शेती क्षेत्राचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाणार आहे.तलाठी कार्यालया मार्फत सातबारा उतारे तहसीलदार कार्यालयात प्रॉपर्टी कार्ड बनविण्यासाठी दिले जाणार आहेत.त्यासाठीचे इंतिग्रेशन प्रणालीचे काम सध्या सुरू आहे.त्यामुळे येत्या काही काळात शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड आणि सात बारा असे दोन्ही अभिलेख मिळणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.