Land Rule :- आता एवढ्या गुंठयांची खरेदी विक्री करता येणार,तुकडेबंदी कायद्यात मोठी सुधारणा,जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Spread the love

Land Rule

Land Rule
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यामध्ये केलेली सुधारणा या बद्दलची माहिती जाणून घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीची किंवा गुंठयांची खरेदी विक्री करता येत नव्हती.सुरुवातीला राज्य सरकारने जिरायती जमिनीसाठी 80 गुंठे आणि बागायती जमिनीसाठी 20 गुंठे क्षेत्राच्या खरेदी विक्री व्यवहारावर निर्बंध घातले होते.

आता राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेनुसर 5 गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे.परंतु त्याकरिता जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींची पूर्व परवानगी घेऊनच खरेदी विक्री व्यवहार करता येणार आहे.त्यासाठी त्यांची रीतसरपणे परवानगी घ्यावी लागणार आहे.

हे पण वाचा:- आपल्या गावातील जमीन खरेदी विक्री व्यवहार आता पहा आपल्याच मोबाईलवरून

त्याकरिता ज्यांना जमीन विक्री करावयाची आहे आणि ज्यांना खरेदी करावयाची आहे अशा दोन्ही व्यक्तींना विनंतीपत्रासह आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.तुकडेबंदी कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या छोट्या जमिनींची खरेदी विक्री करण्यास मदत होईल.

खरेदी विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे

१.खरेदी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींचे विनंतीपत्र
२.विक्रेता आणि खरेदीदार यांची ओळखपत्रे
३.जमिनीचा ७/१२ उतारा
४.८अ उतारा
५.आकाराची नक्कल आणि केवळ शुल्क

खरेदी विक्री प्रक्रिया कशी पार पडणार?

विक्रेते आणि खरेदीदार अशा दोन्ही व्यक्तींनी आपली विनंती पत्रे जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावी.
विनंती पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना पूर्व परवानगी साठी मान्यता करा आणि मंजूर पत्र जरी करा.जिल्हाधिकारी यांनी खरेदी विक्रीसाठी पूर्व परवानगी दिल्यास विक्रेते आणि खरेदीदार खरेदी विक्री करू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment