LPG Gas Rate | दिवाळीपूर्वी सर्व सामन्यांना महागाईचा शॉक,एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढली,पहा नवीन दर!

Spread the love

LPG Gas Rate
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील सर्व सामान्य लोकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे.अशातच दिवाळी सारख्या सणाच्यापूर्वी गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आले आहेत. देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती (LPG Gas Rate)वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तेल कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे 19 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दिल्ली सारख्या ठिकाणी 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.ही वाढीव किंमत 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात येणार आहे.त्यामुळे दिल्ली सारख्या ठिकाणी 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत ही 1833 रुपये असणार आहे.

घरगुती गॅस पण महागला का?
तेल उत्पादक कंपन्यांनी केलेली दर वाढ ही फक्त 19 किलो गॅस सिलिंडरच्या बाबतीतच असणार आहे.त्यामुळे घरगुती सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.घरगुती 14 किलो सिलिंडरची किंमत ही दिल्ली सारख्या शहरात 903 रुपये,मुंबई सारख्या शहरात 902.50 रुपये,बंगलोर शहरात 905.50 रुपये,हैद्राबाद शहरात 955 रुपये आहे.

हे पण वाचा:- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० ची घोषणा,गॅस सिलिंडर वर मिळणार ४०० रुपये सूट!

मागील महिन्यात देखील एक तारखेला वाढल्या होत्या किमती
देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी मागील ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला देखील 19 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली होती.मुंबई सारख्या शहरात ऑक्टोबर महिन्यात 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत ही 202 रुपयांनी वाढवून 1684 रुपये करण्यात आली होती.आता नोव्हेंबर महिन्यात मुंबई मध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1914 रुपये करण्यात आली आहे.

त्यामुळे जवळपास व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत मुंबई सारख्या ठिकाणी 230 रुपयांनी वाढविण्यात आली आहे.तसेच घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment