एलपीजी गॅस धारकांना नवीन वर्षापूर्वीच मोठे गिफ्ट,LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात,जाणून घ्या नवीन दर!LPG Price Update Today 22 December 2023

Spread the love

LPG Price Update Today 22 December 2023
एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे.तेल विपणन कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलो गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना प्रती सिलिंडर ४० रुपये कमी मोजावे लागणार आहेत.तेल विपणन कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फक्त व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात येणार आहेत.घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती मध्ये कपात

दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती कमी जास्त केल्या जातात.परंतु आता १ जानेवारीपूर्वी गॅस सिलिंडरच्या किंमती मध्ये कपात करण्यात आली आहे. संपूर्ण देशात प्रमुख शहरांमध्ये २२ डिसेंबर पासून १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती ३९.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

हे पण वाचा:- घरगुती गॅस सिलिंडरची दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई,ही माहिती तुम्हाला असायलाच हवी!

दिल्लीमध्ये इंडेन व्यावसायिक गॅस सिलिंडर यापूर्वी १७९६.५० रुपयांना मिळत होता तो आता १७५७ रुपयांना मिळणार आहे.मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर यापूर्वी १७४९ रुपयांना मिळत होता आता त्यासाठी १७१० रुपये मोजावे लागणार आहेत.यापूर्वी १ डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर सुधारित करण्यात आले होते.त्यापूर्वी करवा चौथच्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती १०० रुपयांनी वाढविण्यात आल्या होत्या.

महानगरांमधील १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर

•मुंबई – १७१०/- रुपये

•दिल्ली – १७५७/- रुपये

•चेन्नई – १९२९/- रुपये

•कोलकाता – १८६८.५०/- रुपये

घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थे

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आलेली असली तरी देखील ही कपात फक्त १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरती मर्यादित असणार आहे.१४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.यापूर्वी ३० ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली होती.त्यामुळे आजदेखील घरगुती गॅस सिलिंडर साठी ३० ऑगस्ट रोजीचेच दर लागू असणार आहेत.

मुंबई मध्ये घरगुती १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ९०२.५० रुपये,दिल्लीमध्ये ९०३ रुपये,कोलकातामध्ये ९२९ रुपये तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर ९१८.५० रुपये दराने उपलब्ध आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment